वाशीममध्ये सोयाबीनची झेप ३४०० रुपयांपर्यंत

वाशीममध्ये सोयाबीनची झेप ३४०० रुपयांपर्यंत
वाशीममध्ये सोयाबीनची झेप ३४०० रुपयांपर्यंत

अकोला : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने सुधारणा होत आहे. मंगळवारी (ता. १६) हंगामातील सर्वाधिक ३४०० रुपये प्रतिक्विंटल भाव वाशीमच्या बाजार समितीत मिळाला. ३००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दराने या बाजार समितीत २७०० क्विंटल सोयाबीनची विक्री झाली.

या वर्षीच्या सोयाबीन हंगामाची सुरवात दोन हजारांच्या अात झाली होती. अनेक दिवस सोयाबीनच्या दरात मंदी सुरू होती; मात्र नवीन वर्ष सुरू होताच सोयाबीनच्या दरात सुधारणा सुरू झाली. २२०० ते २८०० दरम्यान स्थीर झालेले दर दिवसागणिक वाढत होते. गेल्या १५ दिवसांत साधरणतः ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा झाली. सोमवारी (ता. १५) २९५० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. त्यात १०० रुपयांची सुधारणा होऊन मंगळवारी ३४०० रुपये दर मिळाला.

अकोला येथेही दरात सुधारणा वाशीममध्ये सोयाबीन ३४०० रुपयांपर्यंत विक्री झाली असताना अकोल्यात मात्र किमान २६०० व कमाल ३१६० रुपये दर होता. जानेवारीच्या सुरवातीला अकोल्यात २५०० ते २९३० रुपये दर होते. त्यातुलनेत सध्या अकोला बाजारातही दरांमध्ये सुधारणा दिसत अाहे.

थोडे थांबा; जास्त दर मिळेल : पाशा पटेल मी मूल्य अायोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रात नितीन गडकरी यांच्याकडे शेतमालाच्या भावाबाबत पाठपुरावा केला. राज्य व केंद्राने या विषयावर कार्यतत्परता दाखवली. केंद्रात जे निर्णय झाले त्या निर्णयांचा परिणाम दिसून येत अाहे. जानेवारीच्या सुरवातीला सोयाबीनचा दर ३४०० पर्यंत जाईल हे मी सांगितले होते. परिस्थिती पाहता अाता हे दर थोड्याच दिवसांत चार हजार होऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांना शक्य अाहे त्यांनी थोडे थांबावे. यापेक्षा जास्त दर मिळेल, असे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com