सोयाबीन चार हजारांवर

सोयाबीन चार हजारांवर
सोयाबीन चार हजारांवर

अकोला : नवीन वर्षाच्या सुरवातीला अवघे २५०० ते ३००० रुपयांदरम्यान विकणारे सोयाबीन जानेवारीअखेर चार हजारांपर्यंत जाऊन पोचले अाहे. अवघ्या २५ दिवसांत एक हजाराची ही भाववाढ पहिल्यांदा झाली अाहे, तर दुसरीकडे सरकी व रुईच्या दरांमध्ये घसरण झाल्याने कापसाचे दर पाच हजारांपर्यंत खाली अाले.  मंगळवारी (ता. ३०) बुलडाणा जिल्ह्यातील चिखली बाजारात सोयाबीनला ४०८० रुपये क्विंटल हा उच्चांकी भाव मिळाला. वाशीम बाजारात ३९५९ रुपये, तर खामगावमध्ये ३७०० पर्यंत सोयाबीन विकला.  सोयाबीन उत्पादक देशांमध्ये सोयाबीनबाबत संभ्रमावस्था अाहे. मोठा उत्पादक असलेल्या ब्राझीलमध्ये पीक बदलाच्या मानसिकतेमुळे फ्युचर्स पेरा कमी होण्याची शक्यता अाहे. अमेरिकेतील सोयाबीन वातावरणामुळे धोक्यात अाले. उत्पादकता घटली. सोबतच चीन हा ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवत अाहे. या जागतिक घडामोडींमुळे भारतात सोयाबीनच्या किमती वेगाने वाढत असल्याचे व्यापारी सूत्रांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले. भविष्यात सोयाबीन ४५०० पर्यंत राहू शकते, असा अंदाजही व्यक्त होत अाहे.     कापूस दरात घसरण सोयाबीन वधारत असताना कापसाच्या किमतीत घसरण झाली अाहे. कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट बाजारात सोमवारी कापूस ५०५० दराने विकला. या हंगामात कापूस ५६०० पर्यंत याच बाजारात विकला होता; मात्र गेल्या १५ दिवसांत ४०० ते ४५० रुपयांची घट अाली अाहे. सुरवातीचा कापूस निघून गेला असून, अाता शेवटचा व कवडीयुक्त कापूस येत अाहे. याचाही परिणाम भावांवर झाला. शिवाय बाजारपेठेत सरकीचा दर दीडशे रुपयांनी घसरून १९०० पर्यंत अाला. अातापर्यंत सरकीचा दर २०५० रुपये होता. रुईच्या भावातही घसरण झाल्याने कापसाचे दर कमी झाल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com