कळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवर

कळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवर
कळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवर

नागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात विकल्या गेलेल्या सोयाबीनच्या दरात आता आलेली तेजी शेतकऱ्यांना समाधानकारक ठरली आहे. सोयाबीनचे व्यवहार ३४०० ते ३७२५ रुपये क्‍विंटलने या आठवड्यात झाले. यामध्ये आणखी काही अंशी तेजी येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविला जात आहे. 

सोयाबीनला सुरवातीच्या काळात २५०० ते २७०० रुपये क्‍विंटल इतका अत्यल्प दर मिळाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढीस लागली होती. आयात निर्यात धोरणातील बदल आणि स्थानिक उद्योगांची मागणी या कारणांमुळे दरात तेजी आली आहे. कळमणा बाजार समितीत सोयाबीनची रोजची सरासरी आवक १००० क्‍विंटलच्या घरात आहे. ३१०० ते ३४८० रुपये, ३१०० ते ३५०० आणि त्यानंतर हे दर ३४०० ते ३७२५ रुपये क्‍विंटलवर पोचले. यात काही अंशी आणखी तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे. 

बाजारात तुरीचीदेखील नियमित आवक असून, ती सरासरी ११०० क्‍विंटल असल्याचे सांगण्यात आले. ४२०० ते ४८८२ रुपये क्‍विंटलचा दर गेल्या आठवड्यात तुरीला होता. त्यातही तेजी आली असून, हे दर ४४५० ते ५१५८ रुपये क्‍विंटलवर पोचले. हरभरा दर गेल्या आठवड्यात ४००० ते ४६४१ रुपये क्‍विंटल होते. त्यात काहीशी घसरण नोंदविण्यात आली. या आठवड्यात हरभऱ्याचे व्यवहार ३८०० ते ४५०० रुपयाने झाले. 

हरभऱ्याची सरासरी आवक ३५० क्‍विंटलची आहे. सरबती गहू २६०० ते २९०० रुपये क्‍विंटलवर स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरबती गव्हाची आवक ५५ क्‍विंटलची आहे. लुचई तांदूळ ६७ क्‍विंटलची आवक आणि दर २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचे स्थिर आहेत. ज्वारीची अवघी २ ते ३ क्‍विंटलची आवक आणि दर २२०० ते २४०० रुपये क्‍विंटल होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com