agriculture news in Marathi, Soyabean at Rs. 3700 per kg in kimana market | Agrowon

कळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवर
विनोद इंगोले
मंगळवार, 29 जानेवारी 2019

नागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात विकल्या गेलेल्या सोयाबीनच्या दरात आता आलेली तेजी शेतकऱ्यांना समाधानकारक ठरली आहे. सोयाबीनचे व्यवहार ३४०० ते ३७२५ रुपये क्‍विंटलने या आठवड्यात झाले. यामध्ये आणखी काही अंशी तेजी येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविला जात आहे. 

नागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात विकल्या गेलेल्या सोयाबीनच्या दरात आता आलेली तेजी शेतकऱ्यांना समाधानकारक ठरली आहे. सोयाबीनचे व्यवहार ३४०० ते ३७२५ रुपये क्‍विंटलने या आठवड्यात झाले. यामध्ये आणखी काही अंशी तेजी येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविला जात आहे. 

सोयाबीनला सुरवातीच्या काळात २५०० ते २७०० रुपये क्‍विंटल इतका अत्यल्प दर मिळाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढीस लागली होती. आयात निर्यात धोरणातील बदल आणि स्थानिक उद्योगांची मागणी या कारणांमुळे दरात तेजी आली आहे. कळमणा बाजार समितीत सोयाबीनची रोजची सरासरी आवक १००० क्‍विंटलच्या घरात आहे. ३१०० ते ३४८० रुपये, ३१०० ते ३५०० आणि त्यानंतर हे दर ३४०० ते ३७२५ रुपये क्‍विंटलवर पोचले. यात काही अंशी आणखी तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे. 

बाजारात तुरीचीदेखील नियमित आवक असून, ती सरासरी ११०० क्‍विंटल असल्याचे सांगण्यात आले. ४२०० ते ४८८२ रुपये क्‍विंटलचा दर गेल्या आठवड्यात तुरीला होता. त्यातही तेजी आली असून, हे दर ४४५० ते ५१५८ रुपये क्‍विंटलवर पोचले. हरभरा दर गेल्या आठवड्यात ४००० ते ४६४१ रुपये क्‍विंटल होते. त्यात काहीशी घसरण नोंदविण्यात आली. या आठवड्यात हरभऱ्याचे व्यवहार ३८०० ते ४५०० रुपयाने झाले. 

हरभऱ्याची सरासरी आवक ३५० क्‍विंटलची आहे. सरबती गहू २६०० ते २९०० रुपये क्‍विंटलवर स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरबती गव्हाची आवक ५५ क्‍विंटलची आहे. लुचई तांदूळ ६७ क्‍विंटलची आवक आणि दर २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचे स्थिर आहेत. ज्वारीची अवघी २ ते ३ क्‍विंटलची आवक आणि दर २२०० ते २४०० रुपये क्‍विंटल होते.

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
जळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक...
व्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल...पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची...
शेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
औरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ६५०...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६००...सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन...
अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार...अकोला ः येथील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ...
कळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवरनागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात...
हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार...
राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५०००...सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५०००...जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
यवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घटयवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...