त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी एकत्र आल्याने त्यांना न्याय मिळतो. दूध उत्पादक शेतकरी संघटीतरीत्या रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकार त्यांच्यासमोर झुकते. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जर न्याय हवा असेल तर, त्यांनी संघटित व्हावे. सरकारने आतापासूनच सोयाबीन व कापसाला योग्य भाव देण्याची उपाययोजना करावी अन्यथा २ आॅक्टोबरला बुलडाणा येथे होणाऱ्या सोयाबीन - कापूस परिषदेपासूनच विदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले.

येत्या २ ऑक्टोबरपासून खासदार राजू शेट्टी यांचा विदर्भ दौरा सुरू होत आहे. बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात विदर्भातील सोयाबीन-कापूस परिषद होत आहे. या अनुषंगाने श्री. तुपकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
बैठकीत श्री. तुपकर म्हणाले, की पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन उदध्वस्त झाले. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे नुकसान झाले. या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, मागील वर्षी पीकविमा काढण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना किमान ५० टक्के पीकविमा द्यावा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करावा, तूर उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा करावे; तसेच बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी कापूस- सोयाबीन परिषदेचे अायोजन करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले.
या परिषदेत खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार असून माजी मंत्री सुबोध मोहिते, प्रकाश पोफळे, रसिकाताई ढगे, हंसराज वडघुले, देवेंद्र भुयार उपस्थित राहणार आहेत.
- 1 of 347
- ››