agriculture news in marathi, soyaben, cotton crop in trouble due to lack of rain, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनसह पिके संकटात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

दोन वेळा पडलेला पावसाचा मोठा खंड व चटका देणाऱ्या उन्हामुळे जमिनीतील ओल तुटली. विहिरी अजूनही उपस्यावरच आहेत. मूग, उडिदाचे उत्पादन एकरी ५० किलो ते १ क्‍विंटलपर्यंतच मिळाले. कपाशीची पातेगळ, फूलगळ वाढली. हाताशी आलेलं पीक जातं की काय, अशी स्थिती आहे.
-निवृत्ती घुले, वखारी, जि. जालना.
 

औरंगाबाद : पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यातील सोयाबीन पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेले सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाच जवळपास २२ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. पावसाच्या खंडामुळे कपाशीची पातेगळ, फूलगळ वाढली असून, रस शोषक किडींचाही प्रादूर्भाव वाढल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

मराठवाड्यात यंदा ऊस वगळता ४८ लाख १ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित होते. त्या तुलनेत ४६ लाख ८६ हजार २१४ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असून, त्यापाठोपाठ कपाशीची लागवड झाली आहे. पेरणी झालेल्या खरीप पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कारळ, सूर्यफूल, कपाशी आदी पिकांचा समावेश आहे. मका, मूग, उडीद, सोयाबीन वगळता इतर पिकांची सर्वसाधारण क्षेत्रावरही पेरणी झालेली नाही.

यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी प्रथमच सोयाबीनला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा सोयाबीनच्या सर्वसाधारण १२ लाख ३४ हजार हेक्‍टर असून, त्या तुलनेत १८ लाख ४८ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, दुसऱ्यांदा पावसाच्या खंडाचा सामना करावा लागल्याने जमिनीतील ओल तुटली आहे. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडून त्यांची पानगळ होते आहे. रस शोषक किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला असून, कपाशीची पातेगळ, फूलगळ वाढली आहे. मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाच्या ओढीमुळे त्यास मोठा फटका बसतो आहे.

समाधानकारक पाऊस न झाल्याने उपशावरील विहिरींना अजून मुबलक पाणीच आलेले नाही. शेतकऱ्यांच्या पीक वाचविण्याच्या प्रयत्नात खंडित वीजपुरवठाही खोडा घालतो आहे. पावसाच्या ओढीमुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे नुकसान होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकरी आपल्या कपाशीला उपलब्ध थोड्या बहुत ओलाव्याचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी हलकी वखरणी आणि निंदणी घेत आहेत. पावसाच्या खंडात पिकाला तग धरण्यास मदत होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

असे जाणवताहेत परिणाम

  • ओल तुटल्याने सोयाबीन पडतेय पिवळे
  • कपाशीची वाढ खुंटली; पातेगळ, फूलगळ वाढली
  • मका दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने धोका वाढला
  • भुईमुगाच्या आऱ्याही जमिनीत घुसलेल्या नाहीत
  • दमदार पावसाअभावी विहिरी कोरड्या
  • काही भागात उडीद, मुगाला उत्पादनात मोठा फटका

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...