जळगाव जिल्ह्यात सोयाबीन काढणी वेगात
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017
यंदा सोयाबीनची काढणी वेळेत सुरू झाली, पण सध्या पावसाळी हवामानामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यातच उत्पादनही कमी येत आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसत आहे. एकरी दोन ते पाच क्विंटल उत्पादन आले आहे. 
- भिकन रतन सागोरे, शेतकरी, डोमगाव, जि. जळगाव.
जळगाव : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. परंतु, यंदा सोयाबीन पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने उत्पादन घटले आहे. परंतु, काळ्या कसदार जमिनीच्या भागात सोयाबीनची स्थिती बरी आहे.
 
काढणी जशी सुरू झाली तसे ढगाळ वातावरण आहे. वातावरण खराब होऊन नुकसान होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी काढणीला वेग दिला. यातच मजुरीचे दरही वाढले आहेत. दोन हजार रुपये एकर असे दर सोयाबीन कापणी करणे, तो गोळा करून त्याचा ढीग लावण्यासाठी घेतले जात आहेत. 
 
सोयाबीन मळणीचे दर यंदा १०० रुपये प्रतिक्विंटल असे स्थिर असून, अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन गोळा करणे, कापणे यात वेळ जाईल म्हणून हार्वेस्टरने मळणी करण्यास पसंती दिली आहे. जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव या तालुक्‍यांमध्ये सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली होती. जिल्ह्यात जवळपास २९ हजार हेक्‍टरवर सोयाबीन होता. यातील निम्मा सोयाबीन मळणी होऊन शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. परंतु, निम्म्या सोयाबीनची काढणी अद्याप झालेली नसल्याची माहिती मिळाली.
 
यंदा सोयाबीन काढणीनंतर मिळणारे कुटारही फारसे येत नसल्याचे चित्र आहे. कुटारचा उपयोग पशुधनासाठी होतो. यातच अनेक ठिकाणी कुटारचा दर्जाही फारसा योग्य नसल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे उत्पादन यंदा काहींना बरे आले आहे, तर काहींना अल्प उत्पादन हाती आले. एकरी दोन ते पाच क्विंटल, असे उत्पादन मिळत आहे. यंदा अनेकांना जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली होती. 
 
 

इतर अॅग्रो विशेष
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न...आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक...
एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथआजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...
बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी...पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली...
महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल...बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...