agriculture news in marathi, soyaben procurment process, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील केंद्रांवर ६५० क्विंटल सोयाबीन खरेदी
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

पाचोरा व जळगाव येथेच सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर होते. त्यात ६५० क्विंटल खरेदी झाली आहे. १३ जानेवारी ही खरेदीसाठी अंतिम मुदत आहे. 

- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन
जळगाव : जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रे येत्या १३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात दोन सोयाबीन खरेदी केंद्रे असून, यात आतापर्यंत फक्त ६५० क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. 
 
१० नोव्हेंबरनंतर खरेदी केंद्र खऱ्या अर्थाने सुरू झाले. पाचोरा व जळगाव येथे केंद्रे सुरू असून, त्यात सुरवातीला सोयाबीनची आवक अधिक होती. परंतु नंतर दर्जा व इतर मुद्दे सांगून सोयाबीन परत पाठविला जात होता. दिवाळीनंतर महिनाभर दोन हजार ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर होते.
 
शासकीय खरेदी केंद्रात ३०५० रुपये प्रतिक्विंटल दर होता. त्यामुळे शासकीय केंद्रात सोयाबीनची आवक अधिक होती. आर्द्रता, त्यातील कचरा आदी मुद्यांमुळे हा सोयाबीन खरेदी केंद्रातून ग्रेडर परत पाठवीत होते. या प्रकारावरून जळगाव व पाचोरा येथे अनेकदा शेतकरी व खरेदी केंद्रातील कर्मचारी यांच्यात वाद झाले. या वादांच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंतही पोचल्या. परंतु त्यांची दखल घेऊन कुठेही शेतकऱ्यांच्या बाजूने कार्यवाही झाली नाही.
 
दुसऱ्या बाजूला खरेदी केंद्रात नाकारलेला सोयाबीन बाजार समितीमधील अडतदार किंवा व्यापारी कमी दरात मागायचे. त्याचे लिलावही होत नव्हते. नियमांच्या जाचामुळे शासकीय खरेदी केंद्रात फारशी सोयाबीन खरेदी झालीच नाही. शासनाला खरेदीच करायची नव्हती, म्हणून नियम लावून अडवणूक केल्याचा दावा शेतकरी संघटनेचे कडूअप्पा पाटील यांनी केला आहे.
 
सोयाबीनचे दर मागील पंधरवड्यापासून वाढायला सुरवात झाली. सद्यःस्थितीत दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवरील आवकही कमी झाल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...