agriculture news in marathi, soyaben production may decrease due to lack of rain, varhad, maharashtra | Agrowon

पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन घटण्याची चिन्हे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड असलेल्या सोयाबीन पिकाचे उत्पादन सध्या असलेल्या परिस्थितीमुळे किमान २० टक्‍क्‍यांनी घटण्याची चिन्हे आहेत. पावसाचा खंड असाच वाढत गेल्यास नुकसानीची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होऊ लागली आहे. यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये सुमारे आठ लाख ८७ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे.

अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड असलेल्या सोयाबीन पिकाचे उत्पादन सध्या असलेल्या परिस्थितीमुळे किमान २० टक्‍क्‍यांनी घटण्याची चिन्हे आहेत. पावसाचा खंड असाच वाढत गेल्यास नुकसानीची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होऊ लागली आहे. यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये सुमारे आठ लाख ८७ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे.

गेल्या महिन्यात १५ ते २२ ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस झाल्यानंतर मोठा खंड तयार झाला आहे. काही ठिकाणी नंतरच्या काळात अत्यंत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाचा फारसा फायदाही झालेला नाही. ज्यावेळी पावसाने दडी मारली हा काळ सोयाबीनसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. सर्वत्र शेंगा धरणे, शेंगा परिपक्व होण्याची अवस्था सुरू झाली होती. या काळात आर्द्रता कमी होऊन जमिनीला भेगा पडल्या. सोबतच दिवसाच्या तापमानातील वाढीमुळे दररोज पिकाची अवस्था बिकट होत गेली आहे.

यासर्वांचा फटका पीक उत्पादनावर बसू शकतो. मागील दोन हंगामात पावसाअभावी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती. गेल्या वर्षी सरासरी तीन ते सहा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन झाले. एवढ्या उत्पादनात अनेकांना लागवड व मशागतीवर केलेला खर्चसुद्धा मिळू शकलेला नव्हता. या वर्षाच्या हंगामाची सुरवात चांगली झाली होती. पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्या जूनमध्येच बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. नंतर काहींनी जुलैत सुद्धा पेरणी केली. सध्या सोयाबीनचे पीक कुठे तीन महिन्यांचे तर कुठे दोन-अडीच महिने कालावधीचे झालेले आहे.

सध्याची अवस्था ही उत्पादनाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची आहे. याही हंगामात चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून आला. याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणीसुद्धा केली. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या १५ दिवसांत संरक्षित सिंचन केले अशांचे सोयाबीन पीक तरले असून शेंगासुद्धा चांगल्या परिपक्व झालेल्या आहे. मात्र सर्वसाधारण विचार केल्यास हाही हंगाम सोयाबीन उत्पादकांसाठी परीक्षा घेणाराच ठरला आहे.
 

या हंगामात लागवड झालेले सोयाबीनचे जिल्हानिहाय क्षेत्र
जिल्हा लागवड क्षेत्र (हेक्‍टर)
अकोला  २,०२,५२०
बुलडाणा   ३,९७,४१६
वाशीम २,८७,२६२
एकूण   ८,८७,१९८

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...