अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २३५० ते २८०० रुपये

सोयाबीन
सोयाबीन

अकोला ः येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. १) सोयाबीनची २५६० क्विंटल आवक झाली होती. या वेळी सोयाबीनला २३५० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.  गेल्या अाठ ते दहा दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिरावले अाहेत. या हंगामाला सुरवात झाली, त्या वेळी सोयाबीनचा दर अत्यंत कमी म्हणजेच दोन हजारांच्या अात होता. मात्र अाता हे दर थोडे सावरले अाहेत.  बाजारात मुगाची ३०७ क्विंटल आवक झाली होती, या वेळी मुगाला ४२०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. उडदाची ३९७५ क्विंटल आवक झाली होती, या वेळी उडदाला प्रतिक्विंटल ३५०० ते ४४०० रुपये दर मिळाला. उडीद सराची सरासरी ३९७५ रुपये क्विंटल होती. आवकेपैकी ५८५ क्विंटल उडदाची विक्री झाली. तुरीचा दर मात्र अद्यापही चार हजार रुपयांच्या अात अाहे. किमान ३४०० व कमाल ३८७५ रुपये भाव मिळाला. १३६ क्विंटल तुरीची अावक होती. तुरीचा हंगाम येत्या महिनाभरानंतर सुरू होणार अाहे. या वेळी नेमका काय भाव राहील याबाबत शेतकऱ्यांमध्ये अातापासूनच उत्सुकता अाहे. गहू लोकवन १५७५ ते १८५० दराने विकला. गव्हाची अावक मात्र अवघी ४२ क्विंटल झाली होती. जारीला १०३० ते १३०० रुपये भाव मिळाला. शनिवारी १०३ पोते ज्वारीची विक्री झाली. मक्याला येथील बाजारात ११५० ते १५०० दरम्यान भाव मिळत अाहे. अावक अद्याप फारशी वाढलेली नाही. ४३ पोते मका विक्रीला अाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com