पुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब
बाजारभाव बातम्या
बाजारात सोयाबीन २४०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. गेल्या आठवडाभरात काही अंशी चढ-उतार सोयाबीनच्या दरात झाले असले तरी सोयाबीनचे व्यवहार आजही हमीभावाने होत नसल्याचे चित्र आहे.
नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ चढ-उताराचा अपवाद वगळता बाजारातील शेतमालाचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे दर १० ऑक्टोबर रोजी २६६८ रुपये प्रतिक्विंटल होते. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी त्यात वाढ होत, दर २७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. यात आणखी काही अंशी तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. मात्र अद्यापही हे दर हमीभावापर्यंत पोचले नाहीत.
सोयाबीनचे दर यावर्षी कमी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बाजारात सोयाबीन २४०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. गेल्या आठवडाभरात काही अंशी चढ-उतार सोयाबीनच्या दरात झाले असले तरी सोयाबीनचे व्यवहार आजही हमीभावाने होत नसल्याचे चित्र आहे.
बाजारात धनियाची १० ते ११ क्विंटल आवक होत असून, ४६०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. मोठ्या आकराच्या संत्रा फळाची ४०० ते ४५० क्विंटलची आवक बाजारात नोंदविली जात आहे. मोठ्या आकाराची ही फळे २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलने विकली जात आहेत.
केळीचीदेखील बाजारात आवक होत असून, २८८ ते ३०० क्विंटल अशी ती आहे. ४५० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला आहे. ज्वारीची आवक तीन ते ५ क्विंटल अशी किरकोळ आहे. गेल्या आठवडाभरापासून अशीच स्थिती कायम असून, दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचे आहेत. गहू सरबती ३२२ क्विंटलची आवक, तर २१०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर अशा स्थितीत आहे.
- 1 of 11
- ››