नागपुरात सोयाबीन प्रतिक्विंटल २८५० ते २९५० रुपये

नागपुरात सोयाबीन प्रतिक्विंटल २८५० ते २९५० रुपये

नागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍विंटल असलेल्या सोयाबीनमध्ये तेजी आली आहे. गेल्या सप्ताहात सोयाबीन २८५० ते २९५० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. सोयाबीनची आवक कमी झाल्याने येत्या काळात दरात आणखी तेजीचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सोयाबीनची आवक वाढती असल्याने बाजारात दर कमी झाले होते. सोयाबीन अवघे २३०० रुपयांपासून विकले गेले. गेल्या आठवड्यात मात्र सोयाबीनची आवक मंदावली; परिणामी सोयाबीन दरातही तेजी आली आहे. सोयाबीन २९५० रुपयांपर्यंत पोचले असून, यामध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. २६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनची ३२९३ क्‍विंटल आवक झाली. २६०० ते २८५० रुपये प्रतिक्‍विंटल दराने व्यवहार झाले. २७ नोव्हेंबर रोजी आवक साडेचार हजार क्‍विंटलवर पोचली आणि दर स्थिर होते. २४ नोव्हेंबर रोजी आवक २ हजार क्‍विंटल तर दर २९०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. २८ नोव्हेंबर रोजी २९११ रुपये क्‍विंटलचे दर शेतकऱ्यांना मिळाले. आता सोयाबीनचे व्यवहार २९५० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत.  मोठ्या आकाराच्या संत्रा फळांची आवक १२०० क्‍विंटल असून, २५०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळत आहे. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळाचे दर २७०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलने व्यवहार होत असून, ८०० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. लाल कांदा २३०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलने विकला गेला. पांढरा कांदा १४१९ क्‍विंटलची आवक असून, दर १८०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com