agriculture news in Marathi, soybean at 3660 rupees in Nagpur, Maharashtra | Agrowon

नागपूरला सोयाबीन ३६६० रुपयांवर
विनोद इंगोले
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नागपूर : शेतकऱ्यांकडील ९० टक्‍के सोयाबीन विकल्या गेल्यानंतर आता बाजारात सोयाबीन दरात तेजी आली आहे. विदर्भात सर्वदूर सोयाबीन ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलपेक्षा अधिक दराने विकले जात आहे. वाशीम बाजार समितीत सोयाबीनने ४ हजार रुपये क्‍विंटलचा पल्ला गाठला होता. त्यानंतर आता सोयाबीन दर वाशीममध्ये ३७०० रुपयांवर स्थिरावला आहे. नागपूरच्या कळमणा बाजारात सोयाबीन ३६६० रुपये क्‍विंटल आहे. 

नागपूर : शेतकऱ्यांकडील ९० टक्‍के सोयाबीन विकल्या गेल्यानंतर आता बाजारात सोयाबीन दरात तेजी आली आहे. विदर्भात सर्वदूर सोयाबीन ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलपेक्षा अधिक दराने विकले जात आहे. वाशीम बाजार समितीत सोयाबीनने ४ हजार रुपये क्‍विंटलचा पल्ला गाठला होता. त्यानंतर आता सोयाबीन दर वाशीममध्ये ३७०० रुपयांवर स्थिरावला आहे. नागपूरच्या कळमणा बाजारात सोयाबीन ३६६० रुपये क्‍विंटल आहे. 

मध्य प्रदेश सोयाबीन लागवड आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यापाठोपाठ विदर्भातही सोयाबीन लागवडीचा पॅटर्न रुजला. वाशीम जिल्हयात शेतकऱ्यांची सर्वाधीक सोयाबीनला पसंती आहे. परंतु नजीकच्या काळात दराच्या बाबतीत निराशा होऊ लागल्याने हळद आणि इतर पर्यायी पिकाकडे शेतकरी वळू लागल्याचे चित्र आहे. 

वाशीम परिसरात प्रक्रिया उद्योगांची उभारणीदेखील नजीकच्या काळात झाली आहे. त्याच्याच परिणामी येथील बाजारात सोयाबीनने गेल्या महिन्यात चार हजार रुपये क्‍विंटलचा पल्ला गाठला होता. अमरावती बाजार समितीतदेखील सोयाबीन ३६०० रुपयांवर पोचले. नागपूर (कळमणा) बाजार समितीत ३७०० रुपये क्‍विंटलचा दर सोयबीनला मिळाला. ५ फेब्रुवारी रोजी सोयाबीन विक्री ३६६० रुपये क्‍विंटलने विकल्या गेले. ३० जानेवारी रोजी सायोबीन ३७७५ रुपये क्‍विंटल होते. त्यात काही अंशी घसरण झाल्याचे चित्र आहे. परंतु यापूर्वी २८०० रुपये इतका अत्यल्प दर सोयाबीनला मिळाला. 

बाजारात संत्र्याची आवकसुद्धा होत असून मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचा दर ३० जानेवारी रोजी २५०० ते २८०० रुपये प्रती क्‍विंटल होता. १ हजार क्‍विंटल संत्रा फळांची आवक या दिवशी झाली. या दरात घसरण होत हे दर आता १६०० ते १९०० रुपये प्रती क्‍विंटल झाले आहेत. ३०० क्‍विंटलची आवक २ फेब्रुवारी रोजी झाली.

मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांची १२०० क्‍विंटलची आवक ३० जानेवारीला झाली. २००० ते २५०० रुपये प्रती क्‍विंटल असा मोसंबीची दर होता. २ फेब्रुवारी रोजी हेच दर २००० ते २४०० रुपयांवर पोचले तर आवक ६०० क्‍विंटलची झाली. बाजारात नाशिकच्या द्राक्षाचीदेखील आवक होत आहे. २०० ते ३०० क्‍विंटल अशी सरासरी आवक असून ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल असा दर आहे. 

डाळिंबाची सरासरी आवक १००० क्‍विंटलची आहे.१००० ते ६००० रुपये क्‍विंटल दरावर डाळिंब स्थिरावले आहे. ६०० ते ८०० रुपये क्‍विंटल असलेल्या बटाट्याचे दर ५०० ते ८०० रुपये असे झाले. ३००० क्‍विंटलपेक्षा अधिकची बटाट्याची बाजारातील आवक आहे. लाल कांदा २४०० ते ३००० रुपये क्‍विंटल असून पांढऱ्या कांदयाचे दर १५०० ते १९०० रुपये असे आहेत. बाजारातील कांद्याची आवक १००० क्‍विंटलची आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...