agriculture news in Marathi, Soybean at 3700 rupees in Nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात सोयाबीन ३७०० रुपये
विनोद इंगोले
मंगळवार, 6 मार्च 2018

नागपूर ः सोयाबीनचे दर चार हजारांवर पोचतील, अशी अपेक्षा असताना गेल्या पंधरवड्यापासून दर ३२०० ते ३७०० रुपयांवर स्थिरावले आहेत. सोयाबीनची रोजची सरासरी ४०० क्‍विंटलच्या आसपास आवक आहे, अशी माहिती कळमणा बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

नागपूर ः सोयाबीनचे दर चार हजारांवर पोचतील, अशी अपेक्षा असताना गेल्या पंधरवड्यापासून दर ३२०० ते ३७०० रुपयांवर स्थिरावले आहेत. सोयाबीनची रोजची सरासरी ४०० क्‍विंटलच्या आसपास आवक आहे, अशी माहिती कळमणा बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

धनियाची आवक अवघी २ क्‍विंटलची असून, दर ४६०० ते ४८०० रुपये दर आहे. मूग ४२०० ते ४६०० रुपये क्‍विंटल असून आवक जेमतेम ३ क्‍विंटल आहे. तुरीची १५०० ते २००० क्‍विंटलच्या घरात आवक असून, गेल्या आठवड्यात असलेल्या ४४०० रुपयांवरून घसरण होत ३६०० ते ४०६८ रुपये दर आहेत. हरभरा दर गेल्या आठवड्यात ३३०० ते ४०४२ रुपये प्रतिक्‍विंटल होते. त्यात घसरण होत हे दर ३१०० ते ३४२५ रुपयांपर्यंत खाली आले.

ज्वारीची आवक ३ ते ४ क्‍विंटलच्या होत असून, दर १८०० ते २२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. सरबती गव्हाची आवक ३० ते ३२ क्‍विंटल आणि दर २२०० ते २७०० रुपये क्‍विंटल असे स्थिर आहेत. लुचई तांदूळदेखील २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलवर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचे दर २० फेब्रुवारी २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल होते. १ मार्चनंतर हे दर २५०० ते ३२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले. मोसंबीच्या मोठ्या आकारांच्या फळांची सरासरी ५०० क्‍विंटलची रोजची आवक आहे. मोसंबी सुरवातीला २५०० ते २९०० रुपये प्रती क्‍विंटल होती. त्यात वाढ होत हे दर आता २६०० ते ३३०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. 

लाल कांदा सुरवातीला १८०० ते २३०० रुपये क्‍विंटल होता. १० हजार क्‍विंटलची कांदा आवक बाजारात होत होती. कांदा आवक ४००० क्‍विंटलवर तर दर १२०० ते १५०० रुपये क्‍विंटलवर आले. पांढरा कांदा १३०० ते १८०० रुपये क्‍विंटल होता. ८०० ते ९०० रुपयांपर्यंत पांढऱ्या कांद्याचे दर खाली आले आहेत.

बाजरात लसूनाची देखील आवक होत असून १००० ते २५०० रुपये प्रती क्‍विंटलचा दर लसूनाला होता. हे दर आता ६०० ते १२०० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले आहेत. आल्याचे दर २२०० ते २४०० रुपये क्‍विंटल आणि आवक ९३३ क्‍विंटलची आहे. टोमॅटोचे व्यवहार ७०० ते ८०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. टोमॅटोची आवक ४०० ते ४५० क्‍विंटलची आहे.

इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...