अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २८०० ते ३१४० रुपये

अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २८०० ते ३१४० रुपये

अकोला ः या मोसमातील सोयाबीनचा हंगाम सुरू होताच बाजारात दर घसरायला सुरवात झाली. सप्टेंबरच्या दुसऱ्या अाठवड्यात तीन हजारांवर विक्री होणारे सोयाबीन सोमवारी (ता. २) अकोला बाजारात २८०० पर्यंत घसरले. सोयाबीन दरात तिनशे रुपयांची घसरण असल्याचे दिसून येत अाहे.

सोमवारी येथील बाजारात सोयाबीनला कमीत कमी २८०० व जास्तीत जास्त ३१४० रुपये भाव मिळाला. सरासरी २९५० रुपये दर होता. ४८६ क्विंटलची अावक झाली होती.   

बाजारात मुगाची अावक ९३२ क्विंटल होती. ४५०० ते ५४०० दरम्यान भाव भेटला. सरासरी ५००० रुपये क्विंटलचा दर होता. उडदाची ७४१ क्विंटल अावक अाणि ३८०० ते ४२२५ रुपये दर मिळाला. सरासरी चार हजार रुपये क्विंटल दराने उडदाची विक्री झाली. बाजारात तुरीची अावक हजार पोत्यांवर झाली. १२२५ क्विंटल तूर विक्रीला अाली होती. कमीत कमी ३४५० व जास्तीत जास्त ३६०० रुपये तुरीला क्विंटलला भाव मिळाला. बाजारात हरभरा ३३७५ ते ३९५० रुपये दराने विक्री झाला. ६९ क्विंटलची अावक झाली होती. ज्वारीचा दर ११७५ ते १२११ दरम्यान भेटला. १८ क्विंटल ज्वारीची विक्री झाली.       

अाॅनलाइन नोंदणीचा परिणाम नाही शासनाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अाॅनलाइन नोंदणी करण्याबाबत अावाहन केले अाहे. प्रत्येकवेळी हमीभाव खरेदी होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर बाजारातही त्याचे परिणाम व्हायचे या वेळी मात्र तसे होताना दिसत नाही. सध्या मूग, उडीद, सोयाबीन या तिनही शेतीमालाचे दर हमीभावाच्या खाली अाहेत. प्रत्यक्ष खरेदी सुरू झाल्यानंतर कदाचित बाजारपेठेतील दर वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com