अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये प्रतिक्विंटल

अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये प्रतिक्विंटल
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये प्रतिक्विंटल

अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक मागील काही दिवसांपासून स्थिर झाली आहे. मंगळवारी (ता. ११) सोयाबीनची १५३० क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला सरासरी ३५२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जास्तीत जास्त ३५६० आणि कमीत कमी ३३०० रुपये दर होता. 

आगामी खरीप हंगाम लक्षात घेता साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर येत आहे. त्यामुळे बाजारात दररोज हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक आहे. तुरीच्या दरातही तेजी कायम आहे. तुरीचा कमीत कमी दर ५००० तर जास्तीत जास्त ५८०० रुपये मिळाला. सरासरी ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुरीची ५६१ क्विंटल आवक झाली होती.

बाजार समितीत हरभऱ्याची ९७४ क्विंटल आवक झाली होती. हरभरा ३९०० ते ४२५० दरम्यान विक्री झाली. सरासरी ४१५० रुपये भाव मिळाला. पांढरा हरभरा २६ क्विंटल विक्री झाला. ४००० ते ४६०० असे या हरभऱ्याचे दर होते. सरासरी ४२०० रुपये दर होता.

ज्वारीची १७ क्विंटल एवढी आवक झाली होती. ज्वारीला प्रतिक्विंटल १६०० ते २१०० तर सरासरी २००० रुपये असा दर होता. मंगळवारी गव्हाची आवक ३०० क्विंटल झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १७२५ ते २००० तर सरासरी १८५० रुपये असा दर मिळाला. शरबती गहू ५३ क्विंटल विक्री झाला. या गव्हाला प्रतिक्विंटल २२०० ते २५७५ तर सरासरी २४०० रुपये असा दर होता. 

उडदाचा दर वाढला आहे. कमीत कमी ४७०० व जास्तीत जास्त ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सरासरी ४८०० रुपये दर होता. २२ क्विंटल आवक होती. मुगाची मात्र नाममात्र ६ पोते आवक झाली होती. मुगाला ५८०० ते ५९०० दरम्यान दर मिळाला. ५८५० रुपये सरासरी दर होता. मक्याची २२ पोते आवक होऊन १४३० ते १८२५ रुपये दर मिळाला. १८०० रुपये सरासरी भाव होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com