agriculture news in Marathi, soybean arrival grow up in nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात सोयाबीनची आवक वाढली, दर घटले
विनोद इंगोले
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर ः बाजारात गेल्या आठवड्यापासून सोयाबीनची आवक वाढत आहे, तर दरात घसरण होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सुरवातीला सोयाबीनचे दर प्रतिक्‍विंटल २७५१ रुपये होते, तर आवक ३६०० ते ३८०० क्‍विंटल होती. आवक ४००० क्‍विंटलपेक्षा अधिक झाल्यानंतर हेच दर २३०० ते २६०० रुपये क्‍विंटलवर पोचले. 

नागपूर ः बाजारात गेल्या आठवड्यापासून सोयाबीनची आवक वाढत आहे, तर दरात घसरण होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सुरवातीला सोयाबीनचे दर प्रतिक्‍विंटल २७५१ रुपये होते, तर आवक ३६०० ते ३८०० क्‍विंटल होती. आवक ४००० क्‍विंटलपेक्षा अधिक झाल्यानंतर हेच दर २३०० ते २६०० रुपये क्‍विंटलवर पोचले. 

नागपूरच्या कळमणा बाजारात नव्या हंगामातील सोयाबीन दाखल होत आहे. परिणामी सुरवातीला कमी असलेली आवक आता दिवसागणिक वाढत आहे. त्याचा दरावर थेट परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सद्यःस्थितीत सोयाबीनचे दर २३०० ते २६०० रुपये प्रतिक्‍विंटलवर आहेत. यात सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी नाकारली. देशांतर्गंत सोयाबीनला व्यवसायिक मागणी नसल्याचे कारण त्यामागे दिले जात आहे.

बाजारात ज्वारीची आवक तीन ते चार क्‍विंटल होत आहे. ज्वारीचे व्यवहार १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत. ज्वारीची आवक गेल्या महिनाभरापासून अशीच असून, त्यात वाढीची शक्‍यता नाही. सरबती गव्हाची ३५० ते ४०० क्‍विंटलची आवक होत आहे. २१०० ते२५०० रुपये प्रतिक्‍विंटल या दराने गव्हाचे व्यवहार होत आहे. लुचई तांदळाची आवक १५० ते २०० क्‍विंटल आहे. प्रतिक्‍विंटल १९०० ते २००० रुपये असा दर तांदळाचा आहे.

हरभरा आवक ३६७ ते ५०० क्‍विंटल होत असून, गेल्या आठवड्यात ५००० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत गेलेले हरभऱ्याचे दर ४३०० ते ४८७५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तुरीची ३०० क्‍विंटलची सरासरी आवक असून, ३६०० ते ३९६८ रुपये प्रतिक्‍विंटलचे दर आहेत. मुगाचे व्यवहार ३४०० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटलने होत असून, आवक १६ ते १८ क्‍विंटलची जेमतेम आहे.

मोठ्या आकाराच्या संत्रा फळांची आवक २००० क्‍विंटलच्या आसपास आहे. संत्र्याला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर आहे. संत्रादरदेखील गेल्या आठवड्यापासून स्थिरावले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...