Agriculture News in Marathi, soybean crop down, Marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात सोयाबीन उत्पादनात घट; दरही मोडताहेत कंबरडे
संतोष मुंढे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017
औरंगाबाद : कपाशीपाठोपाठ मराठवाड्यातील सोयाबीन या सर्वाधिक क्षेत्रावरील पिकाच्या उत्पादनातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनात घट आली असतानाच हमीदराच्या आत असलेले सोयाबीनचे दरही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करीत असल्याची स्थिती आहे. 
 
औरंगाबाद : कपाशीपाठोपाठ मराठवाड्यातील सोयाबीन या सर्वाधिक क्षेत्रावरील पिकाच्या उत्पादनातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनात घट आली असतानाच हमीदराच्या आत असलेले सोयाबीनचे दरही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करीत असल्याची स्थिती आहे. 
 
कृषी विभागाच्या लेखी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १७ लाख २१ हजार हेक्‍टरवर यंदाच्या खरिपात सोयाबीनची पेरणी झाली होती. सद्यस्थितीत या पिकाची काढणी व मळणीचे काम वेगात सुरू आहे. मागील दोन आठवड्यांत बरसलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या काढणी व मळणीच्या कामात व्यत्यय निर्माण केला. त्यामुळे या पिकाची काढणी लांबली.
 
केवळ काढणी लांबलीच नाही, तर पावसाच्या प्रदीर्घ खंडानंतर कसाबसा हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचा घास हिरावण्याचे काम परतीच्या पावसाने केले. शासनाच्या हमीदराने सोयाबीन खरेदी केंद्रावर आर्द्रतेची आडकाठी आडवी असली तरी काढणीला आलेले सोयाबीन भिजल्याने त्याची खरेदी निकषाच्या अधिन राहून होणे शक्‍यच नसल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. 
 
कृषी विभागाच्या लेखी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात २५ ते ३० टक्‍के घट येणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात ही घट आता खर्चालाही न परवडण्यापर्यंत जाऊन पोचल्याची स्थिती आहे. दुसरीकडे लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनची वाढ झाली; परंतु त्याला शेंगाच लागल्या नसल्याचा प्रकार समोर आला होता.
 
नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने काहीअंशी सोयाबीनची स्थिती सुधारल्याचा दावा केला गेला. सोबतच या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात १५ ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत घट येण्याचा दावा केला जात आहे.  प्रत्यक्षात या जिल्ह्यांमध्येही उत्पादनात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे यंदा मोठी घट आल्याचे शेतकरी सांगताहेत.
 
दर कंबरडे मोडणारे
मराठवाड्यातील सर्वच भागात सोयाबीनला १८०० ते २८०० च्या आसपासच दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. जे सोयाबीन पावसामुळे भिजल त्याला तर १८०० वा त्यापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना सोयाबीनचे ‘बरे’ उत्पादन झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते भिजल्याने त्याला अपेक्षित दर मिळण्यापासून शेतकरी वंचित राहिल्याचे चित्र आहे. 
 
यंदा एक एकर सोयाबीन पेरले. त्यामध्ये दीड क्‍विंटल उत्पादन झाले. भिजलेल असल्याने लागलीच बाजारात विक्रीसाठी नेले. त्याला २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. खर्चाला परवडला नाही. 
- गणेश चव्हाण, 
काळेगाव ता. जाफ्राबाद, जि.जालना
 
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे यंदा सोयाबीनला फटका बसला. ज्यांनी सोयाबीन काढलं त्यांना दोन ते तीन क्‍विंटलपुढे उत्पादन झालं नाही. दुसरीकडे हमीदर ३०५० प्रतिक्‍विंटल असताना सोयाबीनला २००० ते २८०० च्या पुढे दर मिळेणात.
- ज्ञानोबा तिडके, 
पांगरी, ता. परळी वैजनाथ, जि. बीड 
 
तीन एकर सोयाबीन पेरले. पावसाच्या खंडाने त्यामधील दोन एकर जळाले. त्यामुळं त्यामध्ये रोटावेटर फिरवीले. एक एकर कशीबसे वाचले. त्यात परतीच्या पावसानं घात केला. काढलेली सुडीच काळी पडून गेली, काय करावं. 
- सुधाकार चिंधोटे, 
काळेगाव, ता. जाफ्राबाद, जि. जालना

इतर बातम्या
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम...अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’औषधनिर्माणशास्त्र आणि अन्ननिर्मितीशास्त्र...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...