agriculture news in marathi, Soybean increased in kimana market; Rate stable | Agrowon

कळमणा बाजारात सोयाबीनची आवक वाढली; दर स्थिर
विनोद इंगोले
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नागपूर ः सोयाबीनच्या आवकेने कळमणा बाजार समितीचा परिसर फुलला आहे. सोयाबीनची रोज सरासरी पाच हजार क्‍विंटलची आवक असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. २७०० ते ३००० रुपये क्‍विंटल या दराने सोयाबीनचे व्यवहार होत असून त्यात सध्या तरी वाढ होण्याची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात आले.

नागपूर ः सोयाबीनच्या आवकेने कळमणा बाजार समितीचा परिसर फुलला आहे. सोयाबीनची रोज सरासरी पाच हजार क्‍विंटलची आवक असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. २७०० ते ३००० रुपये क्‍विंटल या दराने सोयाबीनचे व्यवहार होत असून त्यात सध्या तरी वाढ होण्याची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात आले.

हंगामातील सोयाबीनची आवक विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये होत आहे. गेल्या आठवड्यात चार हजार क्‍विंटल एवढी आवक होती. त्यात वाढ होऊन ती आवक या आठवड्यात पाच हजार क्‍विंटलवर पोचली आहे. यापुढील काळात ही आवक आणखी वाढण्याची शक्‍यता असली तरी तूर्तास दरात वाढीची अपेक्षा नसल्याचे सांगण्यात आले. स्थानिक प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढली तरच दर वाढतील, असेही व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

सुरवातीला २७०० ते ३०६४ रुपये क्‍विंटलचे दर सोयाबीनचे होते. या आठवड्यात २६०० ते ३१२० रुपये क्‍विंटलवर ते पोचले. बाजारात हरभऱ्याची २५० ते ३०० क्‍विंटल अशी जेमतेम आवक आहे. ३५०० ते ४१०० रुपये क्‍विंटलचे दर हरभऱ्याला गेल्या आठवड्यात असताना या आठवड्यात ते ३५५० ते ४००० रुपयांवर आले. तूरीची देखील २५० ते ३०० क्‍विंटल अशी सरासरी आवक आहे. ३२०० ते ३४३६ रुपये क्‍विंटल असा तुरीला दर होता. या आठवड्यात ३४५० ते ३७०० रुपये क्‍विंटलवर ते पोचले. मुगाची १९ क्‍विंटलची आवक होत ४००० ते ४२०० रुपयांचा दर मिळाला. सरबती गव्हाची १०० क्‍विंटलची आवक आहे. २५०० ते २९०० रुपयांवर गव्हाचे दर स्थिरावले आहेत. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटलवर लुचई तांदूळ स्थिर असून आवक जेमतेम ५० क्‍विंटलची
आहे.

संत्रा-मोसंबीची आवक
मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांचे व्यवहार २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. ३००० क्‍विंटलची मोसंबीची आवक आहे. संत्र्याची देखील बाजारात आवक असून मोठ्या आकाराच्या फळांना १४०० ते १७०० रुपये क्‍विंटलचा दर असून आवक २२०० क्‍विंटलची आहे.

अशी आहे इतर आवक आणि दर
कांदा (लाल) २००० क्‍विंटल ५०० ते ११०० रुपये
कांदा (पांढरा) ११७६ क्‍विंटल ८०० ते १३०० रुपये
लसून ३८९ क्‍विंटल १००० ते ३००० रुपये
मिरची सुकी ३२२ क्‍विंटल ६००० ते ७००० रुपये
टोमॅटो १०० क्‍विंटल १२०० ते १४०० रुपये

 

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...