agriculture news in marathi, soybean from inter-crop stuck in rules, Maharashtra | Agrowon

आंतरपीकातील सोयाबीन नियमाच्या कचाट्यात
अभिजित डाके
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी सातबारावर पिकाची नोंद आवश्‍यक असा नियम घातला आहे. हा नियम शेतकऱ्यांना मारक ठरणारा आहे. यामुळे हा नियम रद्द केला पाहिजे.
- विलास पाटील, खटाव, जि. सांगली

सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रिसाठी पिकाची नोंद असलेल्या सातबाराची अट घातली आहे; मात्र मुख्य पिकात आंतरपीक घेतले असल्यास त्याची नोंद सातबारावर होत नाही. केवळ मुख्य पिकाचीच नोंद होते. त्यामुळे ऊस पिकात आंतरपीक म्हणून घेतलेल्या सोयाबीनची सातबारावर नोंद नसल्याने नियमाच्या कचाट्यात सापडून हमीभावाने विकणे कठीण झाले आहे.   

शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू केली; मात्र पिकाची नोंद असलेला सातबारा असणे आवश्‍यक असा जाचक नियम लागू केला. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जून, जुलै महिन्यात आडसाली ऊसाची लागवड केली जाते. त्यानंतर सोयाबीनची पेरणी केली जाते आणि सातबारावर पिकाची नोंद करण्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात होते.

शेतकरी तलाठी कार्यालयात ऊस व सोयाबीन पिकाची नोंद करण्यासाठी जातात त्या वेळी सोयाबीन आंतरपीक असेल तर त्याची नोंद होणार नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे सातबारावर केवळ ऊस पिकाची नोंद होते, असा नियम असल्याचे तलाठी सांगतात. आता सोयाबीनची विक्री कशी करणार? असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

दोन जिल्ह्यांत दोन नियम
याबाबत तलाठी यांच्याशी संपर्क केला असता, अहिरेवाडी (ता. वाळवा) येथील तलाठी म्हणाले, शेतकऱ्यांनी उसात सोयाबीन हे आंतरपीक घेतले असले तरी सातबारावर केवळ ऊस पिकाची नोंद केली जाते. सातारा जिल्ह्यातील तलाठी म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस पिकात सोयाबीनचे आंतरपीक घेतले असेल तर त्याची नोंद केली जाते. एका जिल्ह्यात नोंद होते, तर दुसऱ्या जिल्ह्यात सातबारावर नोंद होत नाही; मात्र तलाठ्यांच्या चुकीचा फटाक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

पीकपाहणी नोंद कार्यालयातच बसून
ऑगस्ट महिन्यापासून पिकाची नोंद करण्यास सुरवात होते. तलाठ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करावी, असा नियम आहे; मात्र तलाठी शेतातच जात नाही. शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली आहेत, याची माहिती अंदाजे घेऊन कार्यालयातच पिकाची नोंद केली जाते. यामुळे सातबारात किती टक्के पिकांची नोंद खरी असते, असाही प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया
आडसाली ऊस पिकात सोयाबीन आंतरपीक घेतले होते; मात्र सातबारावर या पिकाची नोंद केली नसल्याने शासनाने घातलेल्या जाचक अटीमुळे खरेदी केंद्रावर हमीभावाने विक्रीसाठी घेऊन जाता आले नाही.
- विलास पाटील, काले, जि. सातारा.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...