अकोल्यात सोयाबीन उत्पादनाला फटका

कौलखेड गोमासे येथे सोयाबीन कापणी व मळणीच्या वेळी उपस्थित जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना.
कौलखेड गोमासे येथे सोयाबीन कापणी व मळणीच्या वेळी उपस्थित जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना.

अकोला ः अकोला तालुक्यातील दहिहांडा मंडळातील कौलखेड गोमासे येथे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या सोयबीन पीक कापणी प्रयोगात कापणी व मळणी करण्यात आली. यावेळी दोन प्लाॅटमध्ये वेगवेगळे अंदाज अाले असून एकाचे ७५७ व दुसऱ्याचे २२२.४ किलो उत्पादन हेक्टरी नोंदविण्यात आले. यामुळे पिकांची स्थिती समाधानकारक नाही यावर शिक्कामोर्तब झाले. कृषी विभागाने जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत नुकतेच या कापणी प्रयोगाचे अायोजन केले होते. कौलखेड गोमासे येथे सोयाबीनचे एकूण ४० हेक्टर पेरणीचे असून त्यापैकी आशा पुडंलिक काटे यांच्या गट क्रमांक ३५ आणि विनायक सोनाजी काटे यांचे गट क्रमांक ५३ मध्ये कृषी विभागाचे कृषी सहायक अनंत देशमुख यांनी रॅण्डम पद्धतीने निवड करून पीक कापणी प्रयोगाचे १०X ५ मी. आकाराचे प्लॅाट टाकले होते. त्या दोन्ही प्लॉटची कापणी व मळणी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत व पर्यवेक्षणात करण्यात आली. यापैकी विनायक सोनाजी काटे यांचे शेतातील प्लॉटमधील निघालेल्या डहाळ्यासह सोयाबीनचे वजन १६ किलो आले. त्यातून ३.७८५ किलो निव्वळ दाण्याचे वजन प्राप्त झाले व आशा पुंडलिक काटे यांच्या प्लॉटमधील निघालेल्या डहाळ्यासह सोयाबीनचे वजन ८.८०० किलो आले. त्यातून १.११२ किलो निव्वळ दाण्याचे वजन प्राप्त झाले. वरीलपैकी एका प्लॉटचे हेक्टरी उत्पादन ७५७ किलो व दुसऱ्या प्लॉटचे हेक्टरी उत्पादन २२२.४ किलो एवढे नोंदण्यात आले. पीक कापणीच्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबत तालुका कृषी अधिकारी नरेद्र शास्त्री, श्री वर्मा, श्याम चिवरकर, नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे, संरपच विश्वासराव गौमासे, मंडल अधिकारी एन.पी. नेमाळे, कृषी सहायक अनंत देशमुख, ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

उत्पादकतेत मोठी घट जिल्ह्याची एकूण उत्पादकता विविध मंडळांतील अहवाल जुळवणीनंतर केली जाणार आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या या पीक कापणी व मळणी प्रयोगाने एकूणच जिल्ह्याची स्थितीत प्रमुख अधिकाऱ्यासमोर मांडली. दहिहांडा मंडळात गेल्यावर्षी हेक्टरी ११२० किलोची उत्पादकता होती. यंदा एका प्लाॅटमध्ये ७ क्विंटल ५७ किलो व दुसऱ्या ठिकाणी अवघी सव्वा दोन क्विंटल उत्पादकता दिसून अाली यावरून उत्पादकता स्पष्ट झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com