agriculture news in Marathi, Soybean production will reduced in country, Maharashtra | Agrowon

देशात सोयाबीन उत्पादन घटीचे संकेत
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई ः देशातील महत्त्‍वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेशमध्ये यंदा उत्पादनात घट आली आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे उत्पादक राज्य राजस्थाननेही आधीच उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर करून कमी उत्पादन होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

मुंबई ः देशातील महत्त्‍वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेशमध्ये यंदा उत्पादनात घट आली आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे उत्पादक राज्य राजस्थाननेही आधीच उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर करून कमी उत्पादन होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

केंद्र सरकारने यंदा सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या १२.२ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात १५ टक्के कपात केली आहे. मागील वर्षी देशात १३.८ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. त्यामुळे सरकारने याआधी जाहीर केलेला अंदाज हा मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा कमी आहे. त्यानंतर लगेच मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांनी उत्पादन घटणार असल्याचे जाहीर केले आहे. कमी उत्पादनाचा अंदाज जाहीर केल्यानंतर देशात सोयाबीनचे दर वाढले आहेत.

मागील तीन महिन्यांत सोयाबीनचे दर ३३ टक्क्यांनी वाढून एनसीडीएक्सवर प्रतिक्विंटल ३७८० रुपये होऊन १७ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेले आहेत. मागील आठवड्यात सोयाबीनचे मागील चार वर्षांतील उच्चांकी ४ लाख ४० हजार टनांचे कॉन्ट्रॅक्ट झाले आहेत. स्पॉट मार्केटमध्ये आॅक्टोबर महिन्यात सोयाबीचे प्रतिक्विंटल २५०० रुपये दराने व्यवहार झाले होते. त्यात आता ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना लागू केल्यानंतर किमती काही प्रमाणात वाढल्या होत्या.

मध्य प्रदेशात ५.३ दशलक्ष टन उत्पादन होणार
मध्य प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजात राज्यात ६.९ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता; मात्र त्यात कपात करून दुसऱ्या सुधारित अंदाजात ५.३ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. राजस्थानमध्येही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने राज्याने पहिल्या अंदाजात दर्शविलेल्या २ दशलक्ष टन उत्पादनात कपात करून १ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे, तर महाराष्ट्रातही मागील वर्षीच्या ४.६ दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा ३.६ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज राज्याने व्यक्त केला आहे.   

आणखी दरवाढीचे संकेत
देशातील सायोबीन हंगाम संपल्यानंतर जेव्हा मे महिन्यात तुटवडा जाणवेल, तेव्हा किमती ४००० ते ४५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. देशात १.३ ते १.५ दशलक्ष टन मागील वर्षाचा साठा शिल्लक आहे. ८.५ दशलक्ष टन उत्पादन झाल्यानंतर एकूण साठा हा १० दशलक्ष टनांपर्यंत जाईल. आॅक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान अंदाजे २.५ दशलक्ष टन सोयाबीनचे गाळप झाले आहे आणि पुढील हंगामात पेरणीसाठी बियाणे म्हणून १.२ ते १.५ दशलक्ष टनांची गरज आहे. त्यामुळे आता जानेवारी ते सप्टेंबर या काळासाठी फक्त ६ दशलक्ष टन सोयाबीन उपलब्ध असणार आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...