agriculture news in marathi, soybean productivity decreased in vidarbha, nagpur | Agrowon

विदर्भात सोयाबीन उत्पादनात घट
विनोद इंगोले
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

या वर्षी परिस्थिती फार विदारक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन सरासरी चार ते पाच क्‍विंटलने घटले. परिणामी ना नफा ना तोटा हेच तत्त्व सोयाबीनकरिता राहील असे वाटते.
- मनीष जाधव, शेतकरी, वागद, जि. यवतमाळ

नागपूर ः विदर्भात कीड, रोग आणि कमी पावसामुळे सोयाबीनला फूल आणि शेंगधारणा झालीच नाही. याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. या वर्षी अनेक जिल्ह्यांत सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मंगरुळपीर (जि. वाशीम) तालुक्‍यात तर स्थिती फारच चिंताजनक आहे.

नागपूर विभागात सोयाबीनचे सरासरी पाच लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. या वर्षी २ लाख ४५ हजार (४४ टक्‍के) क्षेत्रावरच पेरणी झाली. अमरावती विभागात १२ लाख ७८ हजार ५०० हेक्‍टर सरासरी क्षेत्र असताना या वर्षी विक्रमी १४ लाख २५ हजार ५१५ हेक्‍टर (१११ टक्‍के) वर पेरणी झाली. अमरावती विभागात सोयाबीनवर या वर्षी अळी, खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर कमी पावसानेदेखील विदर्भात अनेक ठिकाणी फूल आणि शेंगधारणाच झाली नाही. याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला.

अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ ते ५ क्‍विंटलने घटल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे खर्च भरपाईची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली. २००६ ते २०१७ या कालावधीत सर्वाधिक उत्पादकता २००६-०७ या वर्षात नोंदविली गेली. यावर्षी १५.१४ क्‍विंटल/हेक्‍टरची (६.०५६ क्‍विंटल/एकर) उत्पादकता झाली. सोयाबीनच्या उत्पादकतेवर वातावरण, योग्यवेळी झालेला पाऊस घटक कारणीभूत ठरतात, अशी माहिती अमरावती येथील सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल ठाकरे यांनी दिली. 

प्रतिक्रिया
सोयाबीनचा काढणीचा एकरी खर्च २२०० ते २४०० रुपये लागतो तर पोत्याला मळणी १४० रुपये आणि ५० रुपये वाहतुकीवरचा खर्च येतो. संपूर्ण हंगामात एकरी १३ ते १४ हजार रुपयांचा खर्च होतो. गेल्या वर्षी एकरी उत्पादन १३ ते १४ क्‍विंटल होते. यंदा ७ ते ८ क्‍विंटल आहे. यातून हाती काय पडणार? 
- डॉ. गजानन ढवळे, शेतकरी, शिरपूरजैन, वाशीम

सोयाबीनची १८ एकरांवर पेरणी केली. मात्र ८ एकरांतील सोयाबीनला शेंगाच आल्या नाही. तालुका कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला होता. तालुक्‍यात बहुतांश शेतकऱ्यांना ५० किलो ते ४ क्‍विंटलपर्यंत सरासरी उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी सात ते आठ क्‍विंटलचे उत्पादन झाले होते.
- पुंडलिक तेलंग, शहापूर, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम

गेल्या तीन वर्षातील सोयाबीनची उत्पादकता (क्विंटलमध्ये)

वर्ष हेक्टरी  एकरी
२०१३-१४    ८.५७  २.२२८
२०१४-१५  ४.४०   १.७६
२०१५-१६ ४.४५ १.७८
२०१६-१७  १२.५७  ५.०२८

(स्त्रोत ः अमरावती सोयाबीन संशोधन केंद्र)
 

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...