नांदेडमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल ३००१ ते ३०७२ रुपये

नांदेडमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल ३००१ ते ३०७२ रुपये
नांदेडमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल ३००१ ते ३०७२ रुपये

नांदेड ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) सोयाबीन २ हजार ४९२ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल ३००१ ते ३०७२ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या यंदाच्या हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. २५) सोयाबीनची २ हजार ४९२ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल ३००१ ते ३०७२ रुपये दर मिळाले. हरभऱ्याची २५ क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटल ३५०० ते ३६०० रुपये दर मिळाले. तुरीची २ क्विंटल आवक होती.

तुरीला प्रतिक्विंटल ३३०० रुपये दर मिळाले. हळद (कांडी) ची ६२५ क्विंटल आवक होती. हळद (कांडी) ला प्रतिक्विंटल ६२०० ते ८१४५ रुपये दर मिळाले. हळद  (गोळा)ची २०२ क्विंटल आवक होती. हळद (गोळा)ला प्रतिक्विंटल ६००० ते ७०९५ रुपये दर मिळाले. हळद (तुकडा)ची ४३ क्विंटल आवक होती. हळद (तुकडा)ला प्रतिक्विंटल ५०९० ते ६३३५ रुपये दर मिळाले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) सोयाबीनची १५६८ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २९५० ते ३०७५ रुपये दर मिळाले. हरभऱ्याची १० क्विंटल आवक झाली होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर मिळाले.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) उडदाची २५ क्विंटल आवक होती. उडदाला प्रतिक्विंटल ३९१५ ते ४५९५ रुपये दर मिळाले. हरभऱ्याची ७ क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४५६० ते ५२५० रुपये दर मिळाले. तुरीची १२ क्विंटल आवक झाली होती. तुरीला प्रतिक्विंटल ३४५० ते ३८०५ रुपये दर मिळाले. गव्हाची ७० क्विंटल आवक होती. गव्हाला प्रतिक्विंटल १८१० ते २२०३ रुपये दर मिळाले. हळदीची ३२०५ क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल ६६५३ ते ७१२० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com