agriculture news in marathi, Soybean quintal in kimala market Rs. 2700 to Rs. 3012 | Agrowon

कळमणा बाजारात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७०० ते ३०१२ रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढती आहे. मंगळवारी (ता. २३) सुमारे ४९७१ क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. सोयाबीनचे व्यवहार २७०० ते ३०१२ रुपये क्‍विंटलने झाले.

नागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढती आहे. मंगळवारी (ता. २३) सुमारे ४९७१ क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. सोयाबीनचे व्यवहार २७०० ते ३०१२ रुपये क्‍विंटलने झाले.

मंगळवारी बाजार समितीत शेतमालासह भाजीपाल्याचीदेखील आवक झाली. त्यामध्ये बटाटा १२०० ते १७०० रुपये क्‍विंटल होता. बटाट्याची २६६० क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली. बाजारात लाल कांद्याचीदेखील नियमित आवक आहे. मंगळवारी ५०० ते १२०० रुपये क्‍विंटलने कांद्याचे व्यवहार झाले. १५०० क्‍विंटल लाल कांद्याची आवक झाली. पांढऱ्या कांद्याची आवक ७५६ क्‍विंटलची झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. ८०० ते १३०० रुपये क्‍विंटलने पांढऱ्या कांद्याचे व्यवहार झाले. १००० ते ३००० रुपये क्‍विंटलने लसणाचे व्यवहार झाले. लसणाची आवक ८६० क्‍विंटल झाल्याचे सांगण्यात आले.

बाजारात टोमॅटोची १६० क्‍विंटलची आवक झाली. ९०० ते १२०० रुपये क्‍विंटलने टोमॅटोचे व्यवहार झाले. १६० क्‍विंटल आवक झालेल्या चवळी शेंगांना ८०० ते १२०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची १२० क्‍विंटल आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. १२०० ते १८०० रुपये क्‍विंटलने भेंडीचे व्यवहार झाले. गवार शेंगाचा दर २५०० ते ३२०० रुपये क्‍विंटल होता. १३० क्‍विंटल गवार शेंगाची आवक झाली. १००० ते १२०० रुपये क्‍विंटलने कच्च्या पपईचे व्यवहार झाले. पपईची ५० क्‍विंटल आवक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हिरवी मिरची १५०० ते १८०० रुपये क्‍विंटल होती. २९० क्‍विंटल हिरव्या मिरचीची आवक नोंदविण्यात आली. कारली २००० ते २५०० रुपये क्‍विंटल होती. १३० क्‍विंटल कारलीची आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. काकडी १२०० ते १५०० रुपये क्‍विंटल होती. तर आवक १२० क्‍विंटलची झाली. बाजारात मेथीची देखील आवक होत असून, ११० क्‍विंटलची आवक मंगळवारी झाली. २५०० ते ३५०० रुपये क्‍विंटलचा दर मेथीचा होता. १०० क्‍विंटलची मुळा आवक असून, १२०० ते १५०० रुपये क्‍विंटलचा दर आहे. सीताफळाचे दर १२०० ते २००० रुपये क्‍विंटलने होते. तर आवक २६० क्‍विंटलची झाली.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, नांदेड, हिंगोलीत सोयाबीनच्या...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९...
आले पिकाचे दर स्थिरसातारा   ः गेल्या तीन ते चार...
कोल्हापुरात वांगे दहा किलोस १०० ते ४००...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात वांगी...
जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
जळगावात भेंडी प्रतिक्विंटल १५०० ते ३०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांद्याची आवक कायम, दरांमध्ये चढउतारजळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर...
पपई दरांबाबत शेतकऱ्यांची...धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत...