agriculture news in marathi, Soybean quintal in Nanded 2900 to 3121 rupes | Agrowon

नांदेडमध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल २९०० ते ३१२१ रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

नांदेड ः नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. २७) सोयाबीनची १०९ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २९०० ते ३१२१ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नांदेड ः नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. २७) सोयाबीनची १०९ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २९०० ते ३१२१ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हळद (कांडी)ची ४४४ क्विंटल आवक झाली होती. हळद (कांडी) ला प्रतिक्विंटल ५८०० ते ६१९० रुपये दर मिळाले. हळद (गोळा) ची ८४ क्विंटल आवक झाली होती. हळद (गोळा)ला प्रतिक्विंटल ५८०१ ते ६५५० रुपये दर मिळाले. हळद (तुकडा)ची १६ क्विंटल आवक झाली होती. हळद (तुकडा)ला प्रतिक्विंटल ५२४५ ते ६००० रुपये दर मिळाले. ज्वारीची ४ क्विंटल आवक झाली होती. ज्वारीला प्रतिक्विंटल ११०० रुपये दर मिळाले. गव्हाची २४ क्विंटल आवक झाली होती.
गव्हाला प्रतिक्विंटल १८०० ते १८११ रुपये दर मिळाले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) मुगाची (चमकी) २ क्विंटल आवक झाली होती. मुगाची (चमकी) प्रतिक्विंटल ४२०० रुपये दर मिळाला. मूग (मोगलाई) ३७ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ३६५० ते ४५०१ रुपये दर मिळाले. तूर (लाल)ची ६ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ३४८० रुपये दर मिळाला.

तूर (पांढरी)ची २ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ३४०० रुपये दर मिळाला. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मूग, उडिद, सोयाबीनची आवक सुरू आहे. गुरुवारी (ता. २७) मुगची ६० क्विंटल आवक झाली होती. मुगाला प्रतिक्विंटल ४१०० ते ४८५० रुपये दर मिळाले. उडदाची १११ क्विंटल आवक झाली होती. उडदाला प्रतिक्विंटल ३६०० ते ४१२५ रुपये दर मिळाले. सोयाबीनची ६३५ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल २९०५ ते ३२५० रुपये दर मिळाले. ज्वारी (टाळकी)ची ६ क्विंटल आवक झाली होती.ज्वारीला प्रतिक्विंटल १८७५ रुपये दर मिळाले. गव्हाची ५६ क्विंटल आवक झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १६६५ ते १८९० रुपये दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...