agriculture news in marathi, soybean rate increased possibility, Maharashtra | Agrowon

सोयाबीन वधारण्याची चिन्हे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले तरी हा कल तात्पुरता असून, येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. मध्य प्रदेशात भावांतर योजनेमुळे सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने महाराष्ट्रात दरात घसरण झाली आहे. परंतु, सोयापेंडच्या मागणीतील वाढ, निर्यातीसाठीची मागणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुकूल घडामोडी यामुळे येत्या काळात सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

पुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले तरी हा कल तात्पुरता असून, येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. मध्य प्रदेशात भावांतर योजनेमुळे सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने महाराष्ट्रात दरात घसरण झाली आहे. परंतु, सोयापेंडच्या मागणीतील वाढ, निर्यातीसाठीची मागणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुकूल घडामोडी यामुळे येत्या काळात सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रति क्विंटल ३३९९ रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली. परंतु सध्या राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याची तरतूद असलेली भावांतर भुगतान योजना यंदाही राबविण्यास सुरवात केली. त्यामुळे तिथे आवक प्रचंड वाढून भाव कोसळले. त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे. 

चीनने सोयाबीन आणि मोहरी पेंडेवर घातलेली बंदी उठवावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून जोरदार पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच इराणने भारताकडून वस्तुविनिमय पद्धतीनुसार तेलाच्या बदल्यात सोयापेंड, साखर, तांदूळ आदी शेतमालाची खरेदी करण्याचे मान्य केले आहे. 
यंदा मराठवाडा-विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने ताण दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाच्या गरजेइतका पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील सोयाबीन उत्पादनात १३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा राज्यात ४३.८८ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता १० टक्के वाढल्याचे दिसून येते. यंदा पीक चांगले असले तरी सोयापेंडची मागणी व निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असल्याने दरात पडझड होण्याची शक्यता नाही, असे असे शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकार ‘नाफेड''च्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसंदर्भात दिरंगाई करत असून तातडीने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली.

विक्रीची घाई नको
आगामी काळात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आता कमी दरात सोयाबीन विक्रीची घाई करू नये, सोयाबीनचे दर किमान ३६०० रुपये होईपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहावी, असा जाणकारांचा सल्ला आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी मालाची साठवणूक करून ठेवावी किंवा शेतमाल तारण योजनेत गोदामांत माल ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

सकारात्मक संकेत
सोयापेंडचे सध्याचे दर पाहता निर्यातीसाठी पडतळ (पॅरिटी) मिळत आहे. त्यामुळे निर्यातीसाठीचे चित्र आश्वासक आहे. तसेच पोल्ट्री उद्योगाकडूनही मागणीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. चीन आणि इराण या देशांबरोबर झालेल्या चर्चेमधूनही सोयाबीनसाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...