अमरावतीत सोयाबीन दर स्थिर

सोयाबीन
सोयाबीन

अमरावती ः अमरावती बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून सोयाबीनचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. २३०० ते २८८५ रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार या ठिकाणी होत असून, त्यात काही अंशी तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.  अमरावती जिल्ह्यात तुरीची शासकीय खरेदी अजूनही सुरू आहे. जिल्ह्यात चार केंद्रांवर ५४५० रुपये प्रतिक्‍विंटल या हमीभावाने तूर खरेदी होत आहे. त्याकरिता २९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, २६०४ क्‍विंटल या प्रमाणात त्यांची तूर आहे. बाजारात मात्र तुरीची हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमीने खरेदी होत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनचे दर २३०० ते  २८०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिरावल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गतवर्षीप्रमाणे सोयाबीनचे दर तीन हजार रुपयांचा आकडा पार करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्याकरिता अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे; परंतु सोयाबीन दर २९०० रुपयांवरच अडकले. २८०० रुपयांवर असलेल्या सोयाबीनच्या दरात येत्या काळात आणखी काही अंशी तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे.  अमरावती बाजार समितीत गव्हाचे व्यवहार १७०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहे. मूग ३८०० ते ४७०० रुपये प्रतिक्‍विंटल, उडीद २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल होता. बाजारात मक्‍याचीदेखील आवक होत असून, १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मक्‍याला आहे. ज्वारी ११५० ते २१०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिरावली आहे.  कापसाचे व्यवहार ४७५० ते ५१७० रुपये प्रतिक्‍विंटलचे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर कापसाच्या दरात स्थित्यंतर येतात. आवक, निर्यात धोरण तसेच कापसाचा त्या-त्या देशातील वापर हेदेखील घटक दरावर परिणाम करतात. तरीसुद्धा या वर्षी बोंड अळीने झालेल्या नुकसानीच्या परिणामी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे देशाअंतर्गत गरज भागविण्याकरिता प्रक्रिया उद्योगांकडून मागणी वाढल्यास दरात काही अंशी तेजी येईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com