agriculture news in Marathi, soybean rates at 2225 to 2430 rupees in akola, Maharashtra | Agrowon

अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २२२५ ते २४३० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

अकोला : सोयाबीन हंगामाने जोर पकडलेला असून बाजार पेठांमधील आवकही वाढत आहे. अकोला बाजारात मंगळवारी (ता. ७) सोयाबीनची आवक ५१०३ क्विंटल झाली होती. सोयाबीनला २२२५ ते २६३० रुपये प्रतिक्विंल मिळाला.

अकोल्यातील बाजारात जिल्ह्यासह लगतच्या वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांतून शेतमालाची आवक होत असते. या ठिकाणी दरदिवसाला सोयाबीनच्या आवकेत वाढ होत आहे.
उडदाला ३८०० ते ४३०० व सरासरी ४०५० रुपये दर मिळाला. मुगाच्या दरात किंचित सुधारणा दिसून येत असून आता ४२०० ते ४९५० रुपये दर मिळाला. ७१५ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता.

अकोला : सोयाबीन हंगामाने जोर पकडलेला असून बाजार पेठांमधील आवकही वाढत आहे. अकोला बाजारात मंगळवारी (ता. ७) सोयाबीनची आवक ५१०३ क्विंटल झाली होती. सोयाबीनला २२२५ ते २६३० रुपये प्रतिक्विंल मिळाला.

अकोल्यातील बाजारात जिल्ह्यासह लगतच्या वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांतून शेतमालाची आवक होत असते. या ठिकाणी दरदिवसाला सोयाबीनच्या आवकेत वाढ होत आहे.
उडदाला ३८०० ते ४३०० व सरासरी ४०५० रुपये दर मिळाला. मुगाच्या दरात किंचित सुधारणा दिसून येत असून आता ४२०० ते ४९५० रुपये दर मिळाला. ७१५ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता.

तुरीच्या दरात मात्र अद्यापही तेजी आलेली नाही. अवघे ३६०० पासून तूर विकत आहे. तुरीला जास्तीत जास्त ४०५० चा भाव मिळाला. २६४ क्विंटल तूर विक्री झाली. हरभऱ्याचे दरही स्थिरावले आहेत. ४२०० पासून विक्रीची सुरवात होऊन पाच हजारपर्यंत भाव मिळाला. ६०८ क्विंटल हरभरा विक्रीला आला होता.

खामगावात सोयाबीनची आवक वाढली
वऱ्हाडातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या खामगाव (जि. बुलडाणा) बाजारपेठेत सोयाबीनची आवक दरदिवसाला वाढत चालली आहे. सोमवारी (ता. सहा) या बाजारात १८ हजार २४५ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते. २१०० ते २६५० दरम्यान या सोयाबीनला भाव मिळाला. सोयाबीनचा हंगाम सध्या या भागात जोरावर आहे. काढणी, मळणी सोबतच विक्रीनेही वेग धरला आहे. त्यामुळे दररोज या बाजारात खामगाव तालुक्‍यासह मेहकर, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, अशा विविध भागातून शेतमालाची आवक होत आहे. एक दिवस आधी १३ हजार क्विंटल आवक झाली होती. त्यानंतर १८ हजार क्विंटलवर ही आवक पोचली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेलबारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी...
सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम...सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,...
मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे...
संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना...
वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण...पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची...
साखर कारखानदारीला ५ हजार कोटींचा तोटाभवानीनगर, जि. पुणे ः साखरेच्या घसरलेल्या भावाचा...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा...मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या...
खतांची कार्यक्षमता वाढवेल ठिबकचा वापरऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा...
मोसंबी बागेचे खत व्यवस्थापनप्रगत देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता ही हेक्टरी २५...
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...