नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपये

वाशीम जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे. सोयाबीनचे दर मधल्या काळात खाली आले होते. २३०० रुपये प्रति क्‍विंटलने सोयाबीन विकले गेले. आता काहीशी तेजी सोयाबीन उत्पादक अनुभवत आहेत. २९५० रुपयांपर्यंत सोयाबीन पोचल्याने ते येत्या काळात ३ हजार रुपये प्रति क्‍विंटलवर पोचेल, असे वाटते. - डॉ. गजानन ढवळे, शेतकरी, शिरपूर जैन, जि. वाशीम
सोयाबीन
सोयाबीन

नागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍विंटल असलेल्या सोयाबीनमध्ये तेजी आली आहे. गेल्या सप्ताहात सोयाबीन २८५० ते २९५० रुपये प्रति क्‍विंटलवर पोचले. सोयाबीनची आवक कमी झाल्याने येत्या काळात सोयाबीन दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सोयाबीनची आवक वाढती असल्याने बाजारात दर खाली आले होते. सोयाबीन अवघे २३०० रुपयांपासून विकले गेले. गेल्या आठवड्यात मात्र सोयाबीनची आवक मंदावली. परिणामी सोयाबीन दरातही तेजीचा अनुभव शेतकरी घेत आहेत. सोयाबीन २९५० रुपयांपर्यंत पोचले असून, यामध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. २६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनची ३२९३ क्‍विंटल आवक झाली. २६०० ते २८५० रुपये प्रति क्‍विंटल दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. २७ नोव्हेंबर रोजी आवक साडेचार हजार क्‍विंटलवर पोचली आणि दर स्थिर होते. २४ नोव्हेंबर रोजी आवक अर्ध्यावर म्हणजेच २ हजार क्‍विंटलवर पोचली आणि दरात सुधारणा झाली. २९०० रुपये प्रति क्‍विंटलवर दर पोचले. २८ नोव्हेंबर रोजी २९११ रुपये क्‍विंटलचे दर शेतकऱ्यांना मिळाले. दरातील तेजीमागे आवक कमी होणे हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.  या आठवड्यात सोयाबीनचे व्यवहार २९५० रुपये प्रति क्‍विंटलने होत आहेत. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांची आवक १२०० क्‍विंटल असून २५०० ते ३१०० रुपये प्रती क्‍विंटने व्यवहार होत आहेत. गेल्या आठवडाभरापासून संत्रा स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांनाही मागणी आहे. परिणामी, याचेही दर गेल्या आठवडाभरापासून स्थिर आहेत. २७०० ते ३२०० रुपये प्रती क्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत असून ८०० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. बटाट्याची सरासरी साडेसहा हजार क्‍विंटलची आवक आहे. ७०० ते १००० रुपये प्रति क्‍विंटलने याचे व्यवहार सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com