agriculture news in Marathi, Soybean rates increased by 700 rupees per quintal in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात सोयाबीन दरात क्विंटलमागे ७०० रुपयांनी वाढ
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 16 जानेवारी 2018

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात सोयाबीनची आवक प्रतिदिन १२५ क्विंटल राहिली. पुरवठा कमी व मागणी अधिक दिसून आली. यातच आठवडाभरात दरात क्विंटलमागे ७०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात सोयाबीनची आवक प्रतिदिन १२५ क्विंटल राहिली. पुरवठा कमी व मागणी अधिक दिसून आली. यातच आठवडाभरात दरात क्विंटलमागे ७०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 

सोयाबीनची स्थानिक भागातील आवक मागील पंधरवड्यातच रोडावली. यातच जागतिक पातळीवरील धोरणांमुळे सोयाबीनच्या दरात वाढ व्हायला सुरवात झाली. या महिन्याच्या सुरवातीला दर २४०० तचे २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. त्यात वाढ झाल्याने दर आता ३१०० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. आवक कमी असल्याने लिलावही सकाळीच उरकले जात आहेत. यातच तुटवडा असल्याने काही अडतदार किंवा एजंट मध्य प्रदेशातून सोयाबीन मागवून घेत आहेत. 

उडीद, मूग दरांवर दबाव
गत आठवड्यात मुगाची आवक जवळपास शून्यावर होती. तर उडदाची आवकही नगण्यच राहिली. मुगासह उडदाच्या दरांवर दबाव होता. मुगाचे दर किमान ३५०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. तर उडदाचे दरही कमाल ४२०० रुपयांपर्यंत होते. दरांवर महिनाभरापासून दबाव असून, फारशी दरवाढ होत नसल्याची माहिती मिळाली.  
केळीच्या दरात वाढ
केळीच्या दरात गत आठवड्यात क्विंटलमागे १२५ रुपयांनी वाढ झाली. कांदेबाग व जुनारी केळीमध्ये कापणी कमी झाली. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात कांदेबाग केळीचे कमाल दर सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. दर्जेदार केळीला तर १५५० रुपयांपर्यंत दर मिळाला.

वांगी, कोथिंबीर, मेथीची आवक अधिक
बाजारात भरीताच्या वांग्यांची आवक प्रतिदिन ४२ क्विंटल एवढी होती. त्यांना दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. लहान, काटेरी वांग्यांची आवक प्रतिदिन १८ क्विंटलपर्यंत होती. त्यांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. कोथिंबिरीची आवकही प्रतिदिन सात क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल १२०० रुपयांपर्यंत राहिला. मेथीची आवकही प्रतिदिन सात क्विंटल राहिली. तिला प्रतिक्विंटल ११०० रुपयांपर्यंत दर होता. कांद्याची आवक प्रतिदिन २५० क्विंटल होती. त्याला कमाल २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. बटाट्याची आवकही प्रतिदिन २०० क्विंटल राहिली. त्याला प्रतिक्विंटल २५० ते ४०० रुपये दर होता. टोमॅटोची आवक प्रतिदिन २४ क्विंटल राहिली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर राहिला. 
 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...