सोयाबीनच्या दरात सुधारणा

सोयाबीन
सोयाबीन

जळगाव ः गत सप्ताहात सोयाबीनसह कडधान्यांच्या दरात सुधारणा झाली. सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे सुमारे २०० रुपये वाढ नोंदविण्यात आली. तर मूग व उडदाच्या दरांतही क्विंटलमागे अनुक्रमे १५० व २०० रुपये दरवाढ झाली.  बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या आवकेत गत आठवड्यात घट झाली. आवक प्रतिदिन ४५० क्विंटल एवढी राहिली. मागील पंधरवड्यात प्रतिदिन ६०० क्विंटलपर्यंत आवक होती. आवकेत घट आणि मागणी कायम यामुळे दरवाढ झाली. सोयाबीनला किमान २६५० व कमाल ३१५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मुगाची आवक प्रतिदिन २०० क्विंटल राहिली. तर उडदाची आवक प्रतिदिन ३०० क्विंटल राहिली. उडदाचे दर प्रतिक्विंटल ४५५० रुपयांपर्यंत पोचले. तर मुगाला कमाल ४८५० रुपयांपर्यंत दर राहिला. शासकीय कडधान्य खरेदी केंद्र बंद झाल्यानंतरही दर स्थिर राहिले. पुढील काळात दरवाढ होऊ शकते, अशी शक्‍यता बाजार समितीमधून व्यक्त करण्यात आली.  केळीचे दरही स्थिर राहिले. कांदेबाग केळीला प्रतिक्विंटल ९५० रुपये दर मिळाला. जुनारी केळीला ८५० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. तर वापसीला ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भरिताच्या वांग्याचे दरही १५ रुपये प्रतिकिलो असे राहिले. त्यांची आवक प्रतिदिन २५ क्विंटलपर्यंत होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com