नागपुरात सोयाबीन दरात सुधारणा

सोयाबीन.
सोयाबीन.

नागपूर ः नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला २३०० ते २५०० रुपये क्‍विंटल असलेल्या सोयाबीनचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीन २८०० ते २९०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचली. सोयाबीनच्या आवक कमी होत असल्याने दर वाढल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. सोयाबीनची आवक वाढती असल्याने बाजारात दर कमी झाले होते. सोयाबीन अवघे २३०० रुपयांपासून विकल्या गेले. गेल्या आठवड्यात मात्र सोयाबीनची आवक मंदावली. परिणामी सोयाबीन दरातही तेजीचा अनुभव शेतकरी घेत आहेत. सोयाबीन २९११ रुपयांपर्यंत पोचले असून, यामध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. २० नोव्हेंबर रोजी सोयाबीनची ३२९३ क्‍विंटल आवक झाली होती. या वेळी २४०० ते २८११ रुपये प्रतिक्‍विंटल दराने व्यवहार झाले. २३ नोव्हेंबर रोजी आवक साडेचार हजार क्‍विंटलवर पोचली आणि दर स्थिर होते. २४ नोव्हेंबर रोजी आवक अर्ध्यावर म्हणजेच २ हजार क्‍विंटलवर पोचली आणि दरात सुधारणा झाली. या वेळी २९०० रुपये प्रतिक्‍विंटलवर दर पोचले. २५ नोव्हेंबर रोजी २९११ रुपये क्‍विंटलचे दर शेतकऱ्यांना मिळाले. दरातील तेजीमागे आवक कमी होणे हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.  बाजारात मोठ्या आकाराच्या संत्रा फळांची आवक १२०० क्‍विंटल असून, २५०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलने संत्रा फळांचे व्यवहार होत आहेत. गेल्या आठवडाभरापासून संत्रा स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांनाही मागणी आहे. परिणामी याचेही दर गेल्या आठवडाभरापासून स्थिर आहेत. २७०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत असून, ८०० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. बटाट्याची सरासरी साडेसहा हजार क्‍विंटलची आवक आहे. ७०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलने बटाट्याचे व्यवहार सुरू आहेत. लाल कांदा २३०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलने विकल्या गेला. लाल कांद्याची आवक वाढती असून, २६ नोव्हेंबर रोजी ४६०० क्‍विंटल आवक झाली. पांढरा कांदा १४१९ क्‍विंटलची आवक असून, दर १८०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com