agriculture news in Marathi, soybean rates increased in Nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात सोयाबीन दरात सुधारणा
विनोद इंगोले
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नागपूर ः हंगामाच्या सुरवातीला अवघ्या २२०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटलवर असलेल्या सोयाबीनच्या दरात तेजी अनुभवता येण्यासारखी आहे. बाजारात घटती आवक आणि प्रक्रिया उद्योगाकडून वाढती मागणी त्या पार्श्‍वभूमीवर दर वधारत ते तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. या दरात काही अंशी आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांद्वारे वर्तविली जात आहे. 

नागपूर ः हंगामाच्या सुरवातीला अवघ्या २२०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटलवर असलेल्या सोयाबीनच्या दरात तेजी अनुभवता येण्यासारखी आहे. बाजारात घटती आवक आणि प्रक्रिया उद्योगाकडून वाढती मागणी त्या पार्श्‍वभूमीवर दर वधारत ते तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. या दरात काही अंशी आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांद्वारे वर्तविली जात आहे. 

या वर्षी सोयाबीनलादेखील कमी पावसाचा फटका बसला. मात्र त्यानंतरही सुरवातीला सोयाबीन एकाचवेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर पोचल्याने दर अवघे २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचे होते. आता बाजारातील आवक ३ जानेवारीला ८८९ क्‍विंटल होती तर दर २९४१ रुपये क्‍विंटल मिळाले. ५ जानेवारीला १३५६ क्‍विंटलची आवक आणि दर २९७२ रुपये क्‍विंटलचा दर होता. ६ जानेवारीला दरात चांगलीच सुधारणा होत ३११० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. या दिवशी आवक २०३२ क्‍विंटलची झाली. प्रक्रिया उद्योगाकडून मागणी वाढती असल्याने हे घडल्याचे व्यापारी सांगतात. 

बाजारात संत्र्याचीदेखील आवक होत आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना नेहमीप्रमाणे मागणी असल्याचे चित्र आहे. ६ जानेवारी रोजी मोठ्या आकाराच्या संत्र्यांची ७० क्‍विंटल आवक झाली. २८०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा संत्र्यांचा दर राहिला. मोसंबीचीदेखील आवक बाजारात होत असून, मोठ्या आकाराची मोसंबीची ११०० क्‍विंटल आवक नोंदविली गेली. १७०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल असा मोसंबीचा दर आहे. त्यात काही अंशी सुधारणा होण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले.

बाजारात ज्वारीची आवक तीन ते सात क्‍विंटल अशी जेमतेम असून, १५०० ते २००० रुपये क्‍विंटलचा दर आहे. सरबती गहू बाजारात २१० क्‍विंटल आला. २२०० ते २७०० रुपये गव्हाचे प्रतिक्‍विंटल दर असून, त्यात सुधारणा होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापारी सांगतात. 

तांदळाचे दर ५००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचे असून, आवक १५० क्‍विंटलची आहे. तुरीची आवक १०० ते १४५ क्‍विंटल अशी या आठवड्यात होती. तुरीचे दर ३५०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचे असून, त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. मुगाची १५ ते २० क्‍विंटलची आवक या आठवड्यात झाली. ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाले. यात काही प्रमाणात वाढ होईल.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...