agriculture news in Marathi, Soybean rates increased in Nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात सोयाबीन वधारले
विनोद इंगोले
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नागपूर ः शेतकऱ्यांनी विकल्यानंतर आता बाजारात सोयाबीनमध्ये तेजी आल्याचे चित्र आहे. कळमणा बाजार समितीत ११०० ते १७०० क्‍विंटल अशी सरासरी सोयाबीनची आवक असून, दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. हंगामात सोयाबीनचे दर अवघे २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असे होते. 

नागपूर ः शेतकऱ्यांनी विकल्यानंतर आता बाजारात सोयाबीनमध्ये तेजी आल्याचे चित्र आहे. कळमणा बाजार समितीत ११०० ते १७०० क्‍विंटल अशी सरासरी सोयाबीनची आवक असून, दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. हंगामात सोयाबीनचे दर अवघे २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असे होते. 

कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक आठवडाभरापासून ११०० ते १७०० क्‍विंटल अशी आहे. परंतु शेतकऱ्यांनी आपला  माल केव्हाच विकला; त्यानंतर आता दरात तेजी आली आहे. १० जानेवारी रोजी १३५९ क्‍विंटलची आवक आणि २८५० ते ३०६८ रुपये प्रतिक्‍विंटलचे दर होते. ११ जानेवारी रोजी आवक १९८१ तर दर २८०० ते ३१७५ रुपयांवर पोचले.

दरातील या तेजीमुळे तारण योजना किंवा दरातील तेजीच्या कारणामुळे सोयाबीन न विकणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ८ जानेवारी रोजी हरभऱ्याची अवघी ८ क्‍विंटल आवक होती. ३२०० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटलने हरभरा विकला गेला. ९ जानेवारी रोजीची आवक १८३ क्‍विंटलवर पोचली, तर दर ३२०० ते ३५०० रुपये क्‍विंटल झाले. ११ जानेवारी रोजी हरभरा ३६०० रुपये क्‍विंटलवर पोचला. यापुढील काळात दरात काहीअंशी तेजीची शक्‍यता व्यापारी वर्तवितात. 

मोठ्या आकाराच्या मोसंबीचे व्यवहार १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत. हे दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असून, त्यात फार चढ-उतार होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मोसंबीची आवक १००० ते १३०० क्‍विंटल अशी आहे. महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेशमध्ये बटाटा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्या भागातून बटाट्याची आवक वाढती असून, सरासरी ४ ते ५ हजार क्‍विंटल होत आहे. आवक वाढल्याच्या परिणामी बटाट्याचे दर अवघे ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. त्यात नजीकच्या काळात सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी नाकारली. 

कांदा स्थिर
पांढऱ्या कांद्याचीदेखील बाजारात आवक होत असून, ती १ हजार क्‍विंटलच्या घरात आहे. १६०० ते २६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर कांद्याला मिळतो आहे. लाल कांदा आवक २५०० ते ३००० क्‍विंटलची आहे. लाल कांदा २२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलने विकला जात आहे. लसूण आवक २५० ते ४५० क्‍विंटलची आहे. २००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल असे दर होते. त्यात घसरण होत ते २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. आले आवक ५५० ते ६०० क्‍विंटलची आहे. तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर असलेले आले दर या आठवड्यात २५०० रुपयांवर पोचले. टोमॅटोच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. टोमॅटोचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलच्या दरम्यान आहेत.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...