agriculture news in Marathi, Soybean rates increased in Nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात सोयाबीनच्या दरात आली तेजी
विनोद इंगोले
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर  ः स्थानिक कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात सोयाबीन ३३०० रुपयांवर असताना त्यात तेजी येत हे दर ३५५० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. देशाअंतर्गत प्रक्रिया उद्योगाकडून वाढती मागणी आणि तुलनेत पुरवठा कमी या कारणांमुळे येत्या काळात दरात आणखी तेजी येईल, असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. आठवडाभरापूर्वी सोयाबीनचे दर ३३५० रुपये प्रतिक्‍विंटल, तर आवक ६६५ क्‍विंटलची होती. 

नागपूर  ः स्थानिक कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात सोयाबीन ३३०० रुपयांवर असताना त्यात तेजी येत हे दर ३५५० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. देशाअंतर्गत प्रक्रिया उद्योगाकडून वाढती मागणी आणि तुलनेत पुरवठा कमी या कारणांमुळे येत्या काळात दरात आणखी तेजी येईल, असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. आठवडाभरापूर्वी सोयाबीनचे दर ३३५० रुपये प्रतिक्‍विंटल, तर आवक ६६५ क्‍विंटलची होती. 

राज्यात सोयाबीन दरात तेजी आहे. वाशीम बाजारातदेखील सोयाबीन ३४०० रुपयांच्या पुढे गेले होते. अकोला, अमरावतीसह इतर बाजारात सोयाबीनचे दर वाढले आहेत. नागपूरच्या कळमणा बाजार समितीत २२ जानेवारी रोजी ३३५० रुपये प्रतिक्‍विंटल होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यात तेजी येत हे दर ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. २४ जानेवारी रोजी ३३५१ असा दर होता. त्यानंतर आजवर ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिरावले आहे. 

सोयाबीनमध्ये तेजी आली असतानाच तुरीच्या दरात मात्र घसरण होत असल्याचे चित्र आहे. २२ जानेवारी रोजी १५८ क्‍विंटलची आवक ४००० ते ४२०२ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर अशी तुरीची स्थिती होती. २५ जानेवारी रोजी तुरीचे दर ४५२८ रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. २७ जानेवारीपासून तुरीच्या दरात घसरण होत हे दर ३२०० ते ३६४० रुपयांवर पोचल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. तुरीच्या दरात सुधारण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून फेटाळण्यात आली. 

मुगाची बाजारात ४ क्‍विंटल आवक झाली. ४२०० ते ४४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मुगाला मिळाला. मोठ्या आकाराच्या संत्रा फळालादेखील मागणी आहे. २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा संत्र्याला दर आहे. ४०० क्‍विंटलची सरासरी आवक मोठ्या आकाराच्या संत्रा फळाची होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मोसंबीच्या दरात चढउतार होत आहेत. १६०० ते २३०० असा सुरवातीला मोसंबीची दर होता. त्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. २७ जानेवारी रोजी १८०० ते २४०० रुपयांवर हे दर पोचले आहेत. यापुढील काळात या दरात काही अंशी तेजी येणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले. मोसंबीची सरासरी १५०० ते १८०० क्‍विंटल अशी आवक आहे. द्राक्षाचे दर आठवडाभरापासून स्थिर आहेत. ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल या दराने द्राक्षाचे व्यवहार होत आहेत. 

बटाटा दर स्थिर
बाजारात गेल्या आठवडाभरापासून बटाटा ४०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिर आहे. बटाट्याची आवक सरासरी ३५०० ते ४०००  क्‍विंटलची आहे. पांढरा कांदा १८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिरावल्याचे चित्र आहे. लाल कांदा २००० ते ३५०० रुपये क्‍विंटल असून, आवक ७००० क्‍विंटलची आहे. लसूणही बाजारात स्थिरावला आहे. २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल या दराने लसणाचे व्यवहार मागील आठवड्यात झाले. ४०० ते ४५० क्‍विंटलची लसणाची दरदिवशीची आवक आहे. आले २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. चवळी शेंगाच्या दरात चढउतार होत आहेत. २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर चवळी शेंगाला होता. त्यात सुधारणा होत हे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले.

इतर अॅग्रो विशेष
पाऊस नसताच आला तं पुरला असताखर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्...
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमल...अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील परिषदेनंतर...
भूषा विकासापासून कोसो दूरभूषा , जि. नंदुरबार ः दिवस सोमवारचा (ता. १ ऑक्‍...
..या १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती...मुंबई ः पावसाने मोठी ओढ दिल्याने निर्माण झालेल्या...
राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची...पुणे : महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा...
बाजारात अफवा पसरवून कांदादर पाडण्याचा...नाशिक : दसऱ्यानंतर कांदा बाजारात क्विंटलला चार...
निर्यातीसाठी साखर देण्यास बॅंकांचा नकारपुणे : साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने पॅकेज...
दुर्गम ‘उमराणी’त स्वयंपूर्ण शेती  नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम धडगाव तालुक्‍यातील...
बाजारपेठ अोळखून सेंद्रिय भाजीपाला, ...आढीव (जि. सोलापूर) येथील भारत रानरूई यांनी शेतीची...
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...