पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे.
ताज्या घडामोडी
सद्या सोयाबीनला अपेक्षित मागणी नसल्याचे कारण यामागे व्यापारी देत आहेत. सोयाबीनला उद्योजकांकडून माणगी वाढल्यानंतर दरही काहीसे वधारतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.
नागपूर ः बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली असून, २७३६ रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू असली, तरी येत्या काळात दर वधारण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात खरीप हंगामातील सोयाबीन येणे सुरू झाले आहे. सोयाबीनची आवक ४ ऑक्टोबर रोजी ३३६४ क्विंटल, तर ७ ऑक्टोबर रोजी २९९४ क्विंटल झाली. त्यानंतर सरासरी तीन ते साडेतीन हजार क्विंटल अशी दररोजची सोयाबीन आवक आहे. सोयाबीनची खरेदी २६८१ ते २७३६ रुपये प्रतिक्विंटलने केली जात आहे. हमीभावापेक्षादेखील कमी दर सोयाबीनला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सद्या सोयाबीनला अपेक्षित मागणी नसल्याचे कारण यामागे व्यापारी देत आहेत. सोयाबीनला उद्योजकांकडून माणगी वाढल्यानंतर दरही काहीसे वधारतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.
भुईमूग शेंगाचे दर बाजारात स्थिर आहेत. ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलने भुईमूग शेंगाचे व्यवहार होत असून, ९० ते १०० क्विंटलची सरासरी आवक होत आहे. टोमॅटोचे दर २२०० रुपये प्रतिक्विंटलवरून २५०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. टोमॅटो दरात वाढ होण्याची शक्यता नाही. टोमॅटोची सरासरी आवक १०० क्विंटल आहे. गवार शेंगांचे व्यवहार १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलने होत असून, आवक १२० क्विंटलची आहे. हिरवी मिरचीदेखील बाजारात येण्यास सुरवात झाली असून, २२० क्विंटलची आवक आहे. ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल असा मिरचीचा दर आहे.
शिमला मिरचीचे दर ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असून, आवक ११० क्विंटलच्या घरात आहे. फ्लॉवरची आवक २०० क्विंटलची असून, १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलने व्यवहार होत आहेत. पालकाच्या दरात चढ-उतार गेल्या आठवड्यात अनुभवले गेले. १२० ते १३० क्विंटलची आवक पालकाची असून, ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर ५ ऑक्टोबर रोजी पालकाला मिळाला होता. त्यानंतर आता दर २००० ते २५०० प्रतिक्विंटल असे आहेत.
- 1 of 349
- ››