agriculture news in marathi, soybean rates stable in nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात सोयाबीनचे दर स्थिरावले
विनोद इंगोले
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

नागपूर ः गेल्या वर्षी तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा आकडा पार केलेल्या सोयाबीनचे व्यवहार यावर्षीच्या हंगामात २३५० ते २६३१ रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत.

यावर्षी सोयाबीनची उत्पादकता कमी असली तरी प्रक्रिया उद्योजकांची गरज शिल्लक साठ्याच्या भरवशावर पूर्ण होत असल्याने सोयाबीनला उठाव नाही. त्यामुळेच दरात घसरण झाल्याचे व्यापारी सांगतात. यापुढील काळातदेखील सोयाबीनच्या दरात किरकोळ वाढीचा अपवाद वगळता मोठ्या वाढीची शक्‍यता व्यापाऱ्यांनी फेटाळली. 

नागपूर ः गेल्या वर्षी तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा आकडा पार केलेल्या सोयाबीनचे व्यवहार यावर्षीच्या हंगामात २३५० ते २६३१ रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत.

यावर्षी सोयाबीनची उत्पादकता कमी असली तरी प्रक्रिया उद्योजकांची गरज शिल्लक साठ्याच्या भरवशावर पूर्ण होत असल्याने सोयाबीनला उठाव नाही. त्यामुळेच दरात घसरण झाल्याचे व्यापारी सांगतात. यापुढील काळातदेखील सोयाबीनच्या दरात किरकोळ वाढीचा अपवाद वगळता मोठ्या वाढीची शक्‍यता व्यापाऱ्यांनी फेटाळली. 

कळमणा बाजारात सोयाबीनची दररोजची आवक सहा हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आहे. २३०० ते २६७० रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत हे दर २७६० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. यापुढील काळात दरात किरकोळ वाढीची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. गेल्यावर्षी सोयाबीनचे दर ३ हजारांवर होते. यावर्षी हा पल्ला सोयाबीन गाठेल किंवा नाही याविषयी व्यापारीच साशंक आहेत. प्रक्रिया उद्योजकांकडून उठाव नसल्याचे कारण यामागे ते देत आहेत.

ईमूग शेंगाची आवक ९० ते १०० क्‍विंटलच्या घरात आहे. आठवडाभरापासून शेंगाची आवक स्थिर असून, दरदेखील ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचे आहेत. शेंगाच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी फेटाळली. 

आंबीया बहरातील संत्र्याला मागणी अधिक आणि आवक कमी अशी स्थिती आहे. नैसर्गिक कारणांमुळे फळगळ झाल्याने बाजारात संत्रा आवक मंदावली आहे. परिणामी बाजारात संत्र्याला अच्छे दिन आले आहेत. मोठ्या आकाराची संत्रा फळांची आवक १००० ते १४०० क्‍विंटल अशी आहे, तर दर २५०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलचे आहेत.

मोसंबीची आवक २ हजार क्‍विंटलची असून, दर २६०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल असे स्थिर आहेत. नाशिक, लासलगाव परिसरांतून कांदा आवक बाजारात होत आहे. लाल कांद्याची २५०० क्‍विंटलची आवक दररोजची आहे. १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलने व्यवहार होत आहे. पांढरा कांदा दर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल असून, आवक १३०० क्‍विंटलची आहे. यात वाढ होईल, असा अंदाज व्यापारी सूत्रांनी वर्तविला.

बाजार समितीतील शेतमालाचे दर (रुपये)

शेतमाल     किमान     कमाल
भुईमूग शेंग ३०००     ३५००
सोयाबीन     २३००     २७६०
लाल कांदा  १५००     २०००

    

   

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...