agriculture news in marathi, Soybean Rete at Akolatan 2700 to 3000 rupes per quintal | Agrowon

अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २७०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

अकोला ः सोयाबीन हंगाम या भागात जोमाने सुरू झाल्यामुळे बाजारपेठेतील अावकही मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ९) सोयाबीनची सुमारे साडेचार हजार क्विंटलपेक्षा अधिक अावक झाली होती.

सोयाबीन हे या भागातील प्रमुख पीक असून काढणी जोमाने सुरू झाली अाहे. यामुळे शेतकरी तयार झालेला माल विक्रीला अाणण्याचे प्रमाण अधिक अाहे. सोयाबीनला २७०० ते ३००० दरम्यान दर मिळत अाहे. सरासरी २८५० रुपये दराने सोयाबीन विक्री झाले.

अकोला ः सोयाबीन हंगाम या भागात जोमाने सुरू झाल्यामुळे बाजारपेठेतील अावकही मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ९) सोयाबीनची सुमारे साडेचार हजार क्विंटलपेक्षा अधिक अावक झाली होती.

सोयाबीन हे या भागातील प्रमुख पीक असून काढणी जोमाने सुरू झाली अाहे. यामुळे शेतकरी तयार झालेला माल विक्रीला अाणण्याचे प्रमाण अधिक अाहे. सोयाबीनला २७०० ते ३००० दरम्यान दर मिळत अाहे. सरासरी २८५० रुपये दराने सोयाबीन विक्री झाले.

बाजारात मुगाची अावकही स्थिर अाहे. मूग ४५०० ते ५४५० दरम्यान विक्री झाला. सरासरी पाच हजार रुपये दर मिळाला. ६३१ क्विंटल मूग विक्रीसाठी अाला होता. उडदाची विक्री ३६०० ते ४२५० रुपये क्विंटल दराने झाली. ३९०० रुपये सरासरी भाव मिळाला. ४९२ क्विंटल उडदाची विक्री झाली. या बाजार समितीत तुरीची ३४०० ते ३८००  दरम्यान विक्री सुरू अाहे. मंगळवारी सरासरी ३७०० रुपये दर भेटला. ५५५ क्विंटल तूर विक्रीसाठी अाली होती. गेल्या काही दिवसांत हरभऱ्याची अावकही टिकून अाहे. ८१२ क्विंटल हरभरा विक्री झाली. कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ४१५० रुपये हरभऱ्याचा दर होता. सरासरी ३८५० रुपये दर मिळाला.

ज्वारीचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले अाहेत. अद्याप ज्वारीचा हंगाम सुरू व्हायचा असल्याने चढउतार झालेला नाही. कमीत कमी ११५० व जास्तीत जास्त १३०० रुपये दराने ज्वारी विक्री होत अाहे. २८ क्विंटल ज्वारीची विक्री झाली. येथील बाजारात पांढरा हरभरा ३८०० ते ४२०० रुपये दराने विक्री झाला. ६९ क्विंटल हरभरा विक्रीसाठी अाला होता.

इतर ताज्या घडामोडी
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
पाच मिनिटांत १२० कोटींच्या नियोजनास...जळगाव : समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या...
नवेगावबांधमध्ये पावसाने शेकडो क्विंटल...नवेगावबांध, जि. गोंदिया : येथील शासकीय...
अधिस्वीकृती समितीच्या बैठकीकडे माफसूचे...नागपूर   ः राज्यातील काही कृषी...
सामूहिक शेततळ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  : वाढत्या पाणीटंचाईमुळे शेतकरी...
...ही परिवर्तनाची सुरवात आहे : शरद पवारमुंबई   : देशाच्या संविधानावर, स्वायत्त...
नगर जिल्ह्यात नरेगा कामांवर ६७७६ मजूर...नगर  ः दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन...
सातारा जिल्ह्यात १३३५ शेततळी पूर्ण सातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
भाजपत दोघांचीच मनमानी : यशवंत सिन्हापुणे : सध्या लोकशाही धोक्यात आणणा-या भाजपची घमेंड...
सरकार स्थापनेनंतर लगेचच शेतकऱ्यांना...नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे...
शाश्वत भविष्यासाठी अन्न पद्धतीमध्ये...सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे १० अब्ज...
परभणीत प्रतिटन २२०० रुपये ऊसदरासाठी ‘...परभणी ः गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने गेल्या...