agriculture news in marathi, Soybean seed program will be on two lakh hectares in state | Agrowon

दोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनचे ‘ग्राम बीजोत्पादन’
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

नगर  : केंद्र शासनाच्या (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी १ लाख ६१ हजार क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करू देणार आहे. त्यासाठी प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्राची मर्यादा असेल. तालुका कृषी अधिकारी त्यासाठी परवाना देतील. त्यानतंर शेतकऱ्यांना दुकानातून बियाणे मिळेल.

नगर  : केंद्र शासनाच्या (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी १ लाख ६१ हजार क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करू देणार आहे. त्यासाठी प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्राची मर्यादा असेल. तालुका कृषी अधिकारी त्यासाठी परवाना देतील. त्यानतंर शेतकऱ्यांना दुकानातून बियाणे मिळेल.

कृषी विभागातर्फे पुढील वर्षी बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी खरिपात ग्राम बीजोत्पादन घेतले जाते. यंदा केंद्र शासनाच्या कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानअंतर्गत (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यभरातील २२ जिल्ह्यामध्ये २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक लाभार्थ्यां एक एकर क्षेत्रापर्यंत लाभ घेता येणार आहे. बियाणे बाजारातील विक्रेत्यांकडे उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परवाना घ्यावा लागणार आहे.

प्रत्येक क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. ग्रामबीजोत्पादनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक फुलोऱ्यात असताना महाबीजतर्फे प्रशिक्षण देण्यात येईल. उत्पादित झालेले बियाणे पुढील वर्षी वापरता येणार आहे. बियाणांची टंचाई होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवला जातो असे कृषी विभागातून सांगण्यात आले. विदर्भ, खानदेशातील जिल्ह्यांमध्ये हे क्षेत्र अधिक असेल. नगर जिल्ह्यामध्ये सहा हजार सहाशे ६० हेक्‍टरवर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे.

जिल्हानिहाय दिले जाणारे बियाणे (क्‍विंटलमध्ये)
नशिक ः २७००, धुळे ः ८००, नंदुरबार ः ७००, जळगाव ः १८००, नगर ः ५०००, सोलापूर ः २०००, औरंगाबाद ः १८००, जालना ः ५०००, बीड ः १०,०००, लातूर ः १५०००, परभणी ः ६०००, हिंगोली ः १४००, उस्मानाबाद ः ८०००, नांदेड ः ९०००, बुलढाणा ः ११०००, अकोला ः १७०००, वाशीम ः १७०००, अमरावती ः १८०००, यवतमाळ ः २५०००, वर्धा ः २५००, नागपूर ः ५००, चंद्रपूर ः १२७०.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...