agriculture news in Marathi, soybean sowing on 102 heacter, Maharashtra | Agrowon

सोयाबीनचा पेरा १०२ लाख हेक्टरवर
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली ः देशात कापसाखालील क्षेत्रात घट होऊन तेलबीयांचा पेरा वाढेल अशी शक्यता जणकारांनी पेरणी सुरू होणाच्या आधीच वर्तविली होती. देशात आतापर्यंत १०२ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. 

नवी दिल्ली ः देशात कापसाखालील क्षेत्रात घट होऊन तेलबीयांचा पेरा वाढेल अशी शक्यता जणकारांनी पेरणी सुरू होणाच्या आधीच वर्तविली होती. देशात आतापर्यंत १०२ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. 

मागील वर्षी तेलबियांचे उत्पादन वाढल्याने दर हमीभावापेक्षा कमी झाले होते. केंद्र सरकारने राज्यांना खरेदी केंद्रे उघडून हमीभावाने खरेदी करण्यास सांगितले. परंतु, सरकारची खरेदी एकूण उत्पादनाच्या १० टक्केही होऊन शकली नाही, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे यंदा शेतकरी तेलबीयांची कमी पेरणी करतील अशी शक्यता होती, मात्र, देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बाेंड अळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे, हे या आकडेवारीवरून दिसते. 

सोयबीन हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. देशातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ११३ लाख हेक्टर आहे. यंदा चांगला पाऊस आणि चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनच्या पेरणीत १० टक्के वाढ होऊ शेकते. सोयाबीनचा पेरा ११५ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

हमीभाव वाढीचा परिणाम
केंद्र सरकारने २०१८-१९ च्या खरिपात तेलबियांच्या हमीभावात वाढ केली आहे. त्यामुळे मागील वर्षी दर कमी मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांनी यंदा तेलबिया पेरणी अधीक केली आहे. मॉन्सूनच्या काळात चांगला पाऊस आणि हमीभावावाढीने शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा अधिक केला आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१७-१८ मध्ये सोयाबीनसाठी ३०५० रुपये हमीभाव जाहिर केला होता. त्यात ३४९ रुपयांनी वाढ करून २०१८-१९ साठी ३३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने जाहिर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची जास्त पेरणी केली, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

चांगला पाऊस
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जास्त पेरणी केली आहे. मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा नऊ टक्के अधीक, महाराष्ट्रात १८ टक्के तर राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा १९ टक्के अधीक पाऊस झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. देशात शेतकऱ्यांनी पेरणीस पोषक अशा जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे.मात्र काही भागातील शेतकरी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पेरणी करत आहेत, असेही कृषी तज्ज्ञांनी सांगितले. 

  

इतर अॅग्रो विशेष
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...