चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्‍न संवेदनशीलतेने मांडू : आमदार कुल

चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्‍न संवेदनशीलतेने मांडू : आमदार कुल
चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्‍न संवेदनशीलतेने मांडू : आमदार कुल

पंढरपूर, जि. सोलापूर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीची स्वच्छता महत्त्वाची आहे. तिचा सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. त्यामुळे त्या संदर्भातील प्रश्‍न आपण संवेदनशीलतेने मांडू, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठात वसुंधरा विकास संस्था, समग्र नदी परिवार आणि जलप्रदूषण विरोधी कृती समितीतर्फे "क्षमामि चंद्रभागा'' परिषद आयोजित करण्यात आली होती. जलतज्ज्ञ अनिल पाटील, ॲड. असीम सरोदे, सुनील जोशी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, रामेश्‍वर शास्त्री, श्‍यामसुंदर सोन्नार, डॉ. विजय परांजपे, पंचप्पा कलबुर्गे, भारत मल्लाव आदी उपस्थित होते.

कुल म्हणाले, "दौंड मतदार संघातून भीमा अर्थात चंद्रभागा नदी वाहते. त्यामुळे तिचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यादृष्टीने सर्वोतपरी मदत करू'' नदीचे संवर्धन, संरक्षण, शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. कृष्णा नदीचे अडवलेले पाणी भीमा नदीत आणले पाहिजे. त्यामुळे भीमा आणि उपनद्यांना पाणी मिळण्यास मदत होईल, असे  डॉ. परांजपे यांनी सांगितले.

रामेश्‍वर शास्त्री म्हणाले, राज्यातील चंद्रभागा व अन्य नद्यांच्या स्वच्छतेसाठी वारकरी संप्रदाय आणि अभ्यासकांची समिती स्थापन करावी. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन होईल." कीर्तनामधून मुक्तीच्या आणि मोक्षाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा पर्यावरण रक्षणासंबंधीचे प्रबोधन करावे, असे ‍ सोन्नार यांनी सांगितले.

ॲड. सरोदे म्हणाले, ‘नमामि चंद्रभागा' अभियान हे शासनाने धर्मावर आधारित केले आहे. ते शास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या आरंभले पाहिजे.

परिषदेत झालेले ठराव

  • नमामि चंद्रभागा अभियान लोकाभिमुख व्हावे,
  • सुशोभीकरण न करता मूळ प्रश्‍नांची सोडवणूक व्हावी,
  • अभियानासाठी केवळ निधी नको तर चंद्रभागेत मिसळणारे पाणी थांबवावे,
  • पंढरपुरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपकेंद्र स्थापावे
  • सरकारने नद्या आणि त्या संदर्भातील प्रश्‍नांची माहिती जाहीर करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com