agriculture news in marathi, Special committee on Sugar Industires issues says CM | Agrowon

साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात विशेष समिती : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई : राज्यातील साखर उद्योगांच्या समस्यांसंदर्भात उपाय योजण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शक्तीप्रदत्त समितीची स्थापना करण्याचे, तसेच केंद्राकडे असलेल्या विविध विषयांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे नुकतेच दिले.

साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात विधानमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२१) बैठक झाली. साखरेचे दर, अतिरिक्त उत्पादनामुळे होणारी अडचण, एफआरपीचा दर, ऊस क्षेत्रात झालेली वाढ आदी विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.

मुंबई : राज्यातील साखर उद्योगांच्या समस्यांसंदर्भात उपाय योजण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शक्तीप्रदत्त समितीची स्थापना करण्याचे, तसेच केंद्राकडे असलेल्या विविध विषयांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे नुकतेच दिले.

साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात विधानमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२१) बैठक झाली. साखरेचे दर, अतिरिक्त उत्पादनामुळे होणारी अडचण, एफआरपीचा दर, ऊस क्षेत्रात झालेली वाढ आदी विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘साखर कारखानदारांच्या व उद्योगांच्या समस्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर संघ, खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसह विविध विभागाचे सचिव यांचा समावेश आहे. ही समिती तातडीने कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात उपाय सुचविणार आहे.’’

राज्यात अतिरिक्त साखर उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन साखर निर्यात करण्याची परवानगी द्यावी व त्यासंदर्भात प्रत्येक कारखान्याला निर्यातीचा कोटा ठरवून देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाशी निगडित विषयासंदर्भात प्रधानमंत्री यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

श्री. वळसे पाटील यांनी साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात माहिती दिली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, मधुकरराव चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री राजेश टोपे, हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

इतर बातम्या
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...