agriculture news in Marathi, Special feature on farmers diwali, Maharashtra | Agrowon

उधार-उसणवारी, पदरमोड करून दिवाळी साजरी
माणिक रासवे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

यंदा कमी पावसामुळे पिकाचा उतारा कमी आला. कापूस निघाला आहे. कमी भाव असल्यामुळे अजून विकला नाही. दिवाळीसाठी पदरमोड करावी लागली.
- शिवानंद लांडगे, बनवस, ता. पालम, जि .परभणी.

दिवाळी शेतकऱ्यांची...

परभणी ः खरिप हंगामात दुबार तिबार पेरणी करूनही हाती काही लागले नाही. रब्बी हंगामातही दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. निसर्गाने हाती आलेल्या पिकासोबतच दिवाळीचा आनंद हिरावून घेतला. परतीच्या पावसामुळे लाबंलेली रब्बीची पेरणी आणि सोयाबीनची सुगी सुरू असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना शेतकामातून दिवाळी साजरी करण्यासाठी उसंत मिळाली नाही. खरीप हंगाम वाया गेलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना उधार-उसणवारी, पदरमोड करून दिवाळी साजरी करावी लागली तर दिवाळीसाठी उधार -उसणवारी करण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आदी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री केली.

कर्जमाफीच्या लाभार्थीना प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली; परंतु अनेक शेतकऱ्यांना लाभार्थीच्या यादीतील शोधून सापडले नाही. आता दिवाळसण संपला आहे. माॅन्सून परतला तरी ईशान्य माॅन्सून पाठीमागे लागलाय त्यापासून हाती आलेली पिके वाचविण्यासाठी एकीकडे शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

दुसरीकडे रब्बीची पेरणीदेखील वाया गेल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. यंदा निसर्गाने शेतकऱ्यांच्या दिवाळाची आनंद हिरावून घेतला आहे, असे सातत्याने अस्मानी सुल्तानी संकटाचे आघात सोसत असलेल्या शेतकऱ्यांना वाटत आहे.

यंदा परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी अवर्षणाचा आणि नंतर अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मूग, उढीद,सोयाबीन, कापूस आदी खरिप पिकांच्या उतारा घसरला आहेत. त्यात ही पिके काढणीच्या काळात आलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

उत्पादनातील घट, मजुरीचे वाढलेले दर, डागील मालामुळे शेतमालाला मिळणारे हमीभावापेक्षा कमी दर यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला. मागचेच वर्षे बरे होते असे म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा यंदा दिवाळी काही दिवस लवकर आली. ती तब्बल आठवडाभर दिवाळी होती; परंतु दिवाळीच्या काळातच रब्बी पेरणी, सोयाबीनची काढणी, कापूस वेचणी ही सारी कामे सुरू होती.

त्यात पाऊस येण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकामे उरकण्यासाठी सकाळ ते संध्याकाळपर्यंत शेतामध्येच रहावे लागले. त्यामुळे शेतकरी तसेच शेतमजूर वर्गाला दिवाळी सण साजरे करण्यासाठी जरादेखील उसंत मिळाली नाही.

यंदा अजिबात पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामात काहीच हाती लागले नाही. रब्बीची पेरणी केली, परंतु जास्त पावसामुळे ज्वारी उगवली नाही. हरभऱ्यास मर लागली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कशाची दिवाळी आली साहेब.
- बालासाहेब हरकळ, शेतकरी, गौंडगाव, ता. पाथरी, जि. परभणी 

 

इतर बातम्या
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
सोलापूर जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत नाही सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
पीकविम्यापासून ४५ हजार शेतकरी वंचित जळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात राबविलेल्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
उत्तम व्यवस्थापनाद्वारेच कापसाच्या...धुळे : कापूस पीक चांगले उत्पादन देते; परंतु...
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...