agriculture news in marathi, Special series on Milk crises in Maharashtra | Agrowon

भरकटलेल्या धोरणांमुळे सहकारी दूध संघ संकटात
मनोज कापडे
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग एक

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात उत्तम जोडधंदा बनलेला दुग्ध व्यवसाय आता दुधाला दर नसल्यामुळे कमालीचा संकटात सापडला आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेल्या दूध धंद्याचे गणित विस्कटण्यास सरकारचे भरटलेले धोरणच जबाबदार असून, शासकीय बेफिकीरीमुळे सहकारी दूध संघांना टाळे ठोकावे लागेल, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. 

विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग एक

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात उत्तम जोडधंदा बनलेला दुग्ध व्यवसाय आता दुधाला दर नसल्यामुळे कमालीचा संकटात सापडला आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेल्या दूध धंद्याचे गणित विस्कटण्यास सरकारचे भरटलेले धोरणच जबाबदार असून, शासकीय बेफिकीरीमुळे सहकारी दूध संघांना टाळे ठोकावे लागेल, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. 

''शेतकऱ्यांसाठी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये करून राज्य शासनाने चांगले पाऊल टाकले. मात्र, हेच दूध दूध संघांना ३३ रुपये खर्च करावे लागत होते. त्यामुळे सरकारी जबरदस्तीने संघांचे कंबरडे मोडले आहे. बाजारात दूध पावडरचे दर २६० रुपयांवरून १५० रुपयांवर आले आहेत. शिवाय वाढीव १२ टक्के जीएसटीचा भुंगा लावण्यात आल्यामुळे दूध संघांची एकूण अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे, अशी माहिती दूध संघांच्या सूत्रांनी दिली.

राज्यात सध्या मागणीपेक्षाही शेतकऱ्यांकडून जादा पुरवठा होत असलेल्या दुधाची शासनाने खरेदी करणे, दूध पावडर निर्यातीसाठी सरकारी अनुदान, दूध संघाचा तोटा भरून काढण्यासाठी दूध खरेदीवर अनुदान असे विविध उपाय सरकारने करणे अत्यावश्यक आहे. मात्र, सरकार गप्प असल्यामुळे तोट्यात चालणाऱ्या दूध संघांना व खासगी डेअरीचालकांना भविष्यात दूध खरेदी बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी माहिती पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली. 

राज्यात सध्या एक कोटी २० लाख लिटर्स दुधाची रोज विक्री होते. मोठा उद्योग असून दूध धंद्यासाठी धोरण नसल्यामुळे सहकारी संघ आणि खासगी डेअरीचालक हैराण झाल्याचे दिसून येते. राज्यातील दूध संघांचे बिघडलेले गणित बघता संघांना प्रतिलिटर ४३.४४ रुपयांचा खर्च येतो. एका बाजूला ग्राहक वर्ग ४४ रुपयांपेक्षा जादा किंमत मोजून महागात दूध घेतो तर शेतकऱ्यांना २२ ते २४ रुपये दराने तोट्यात दूध विकावे लागते आहे.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याकारी संघाच्या म्हणण्यानुसार, राज्याची सहकारी दूध संकलन व्यवस्था अडचणीत आहे. दुसरीकडे ‘अमूल’सारख्या मोठ्या ब्रॅंडशी स्पर्धा करावी लागतेय. राज्यात आता बहुतेक मोठ्या जिल्ह्यांमध्ये ‘अमुल’कडून दूध गोळा केले जात आहे. खासगी डेअरी प्रकल्पांची संख्यादेखील वाढल्यामुळे सहकारी दूध संकलन सोसायट्या, तालुका दूध संघ, जिल्हा दूध संघ आणि राज्याचा दूध महासंघदेखील अडचणीत आलेला आहे. 

गुजरातमधील अमूलशी स्पर्धा करणाऱ्या महाराष्ट्रातील सहकारी दूध संघांना दुसऱ्या बाजूने कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या पिशवी बंद दुधानेदेखील आव्हान दिले आहे. कर्नाटक सरकारने दुधाला पाच रुपये अनुदान दिले आहे. यामुळे कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकले जात असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. संकटकाळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचे धोरण कर्नाटकला जमते, मग महाराष्ट्र सरकारला ते का सूचत नाही, असा सवाल दूध संघांकडून उपस्थित केला जातोय.

राज्यातील दूध संघांचे बिघडलेले गणित

  दूध खरेदी दर (३.७ फॅट ८.६ एसएनएफसाठी)  २७.६० रुपये
  दूध सोसायटीचे कमिशन  १.२०
  जनावरांवरील औषधोपचार  ०.६०
  शेतकरी भाव फरक  ०.८०
  अंतर्गत वाहतूक खर्च  ०.७०
  शीतकरण खर्च  ०.२०
  प्रक्रिया खर्च  ०.७०
  कर्मचारी वेतन  १.३०
  व्यवस्थापन खर्च  ०.४०
  दूध वाहतूक खर्च मुंबईसाठी  १.४०
  पॅकिंग व कोल्ड स्टोअर  १.७०
  पॉलिथिन खर्च  ०.८६ पैसे
  वितरण वाहतूक खर्च  १.३८
  वितरकाचे कमिशन  ३.५०
  मार्केटिंग, जाहिरात खर्च  १.१०
  एकूण  ४३.४४ रुपये

 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...