Agriculture News in Marathi, speech of the co-operation minister subhash Deshmukh, Solapur, Maharashtra | Agrowon

अनुदानातून नव्हे, योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा ः सहकारमंत्री
सुदर्शन सुतार
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017
सोलापूर : सहकार क्षेत्राची अवस्था बदलायची असेल तर सहकार क्षेत्रात अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आयोजित राज्यतस्तरीय पणन व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना केले.
 
सोलापूर : सहकार क्षेत्राची अवस्था बदलायची असेल तर सहकार क्षेत्रात अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आयोजित राज्यतस्तरीय पणन व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना केले.
 
   सोलापुरात नुकतीच ही कार्यशाळा झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू. एस. इंदलकर, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, अटल महापणन विकास अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) यांच्या सहकार्याने विविध महिला बचत गटांच्या स्टॉलचे उद्‍घाटन सहकारमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
    सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘व्यापाराचे अर्थकारण बदलल्यामुळे सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, विविध विकास सोसायट्या तसेच बाजार समित्यांसमोर आव्हाने आहेत. त्यांना टिकावयाचे असेल तर त्यांनी मार्केटिंग व ब्रॅंडिंग करून वेगवेगळे प्रक्रिया उद्योग सुरू करून आर्थिक परिस्थिती सुधारावी लागेल. त्यांनी विविध महिला बचत गटांच्या माध्यमातील उद्योगांना एक बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचाही या माध्यमातून आर्थिक विकास करणे गरजेचे आहे. राज्य शासन विविध संस्थांचे संगोपन व बळकटीकरण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.’’

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...