agriculture news in marathi, Speed ​​up the Nashik-Pune railway work | Agrowon

नाशिक-पुणे रेल्वे कामाला गती द्यावी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

नाशिक : रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे मनमाड- इंदूर मार्गाबाबत नुकताच ''एमओयू'' करण्यात आला असून, नाशिक- पुणे हा लोहमार्गही लवकर कार्यान्वित करावा, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

नाशिक : रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे मनमाड- इंदूर मार्गाबाबत नुकताच ''एमओयू'' करण्यात आला असून, नाशिक- पुणे हा लोहमार्गही लवकर कार्यान्वित करावा, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

नाशिक-पुणे-मुंबई हा खरे तर गोल्डन ट्रँगल असून, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. या ठिकाणच्या जागांचे भाव प्रचंड असून, जागेची उपलब्धताही फारशी नाही. त्यामुळे पुणे-नाशिकची कनेक्टिव्हिटी चांगली झाल्यास नाशिकच्या विकासाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाने २२० किलोमीटर प्रतितास धावण्याच्या क्षमतेचे नवीन कोचेस आणूनही रेल्वे ट्रॅकची क्षमता निम्मीच असल्याने त्या अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. ही बाब नवीन लोहमार्गात दूर होणार असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे गाडीचा वेग दुपटीने वाढणार आहे. यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सध्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. सविस्तर सर्वेक्षण, भूसंपादन, तसेच निविदा कार्यवाही याबाबत कालबद्ध पद्धतीने नियोजन होणे अपेक्षित आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर कार्यान्वित होण्यासाठी संबंधितांची आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही या पत्राद्वारे महाजन यांनी केली आहे.

उद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प :
नाशिकसाठी महत्त्वपूर्ण अशा इगतपुरी-मनमाड या १२४ किलोमीटरच्या तिसऱ्या रेल्वे लाइनचे कामही प्रस्तावित आहे. इगतपुरी आणि मनमाड यादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच तिसरा व महत्त्वाचा नाशिकचा मनमाड- इंदूर लोहमार्ग धुळे आणि मालेगाव या शहरांतून जाणार असून, तो नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे, असा आशावाद वर्तविण्यात आला आहे.

इतर बातम्या
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
खानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...