agriculture news in marathi, Speed ​​up solar projects : Bavankule | Agrowon

निम्न वर्धा, बेंबळा सिंचन प्रकल्पांवरील सौर प्रकल्पांना गती द्या ः बावनकुळे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

मुंबई : निम्न वर्धा सिंचन प्रकल्प येथे प्रस्तावित ७ मेगावॉट व बेंबळा सिंचन प्रकल्पापैकी ८ मेगावॉटच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (ता. २८) दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार डॉ. अनिल बोंडे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे संचालक अ. ब. सुर्वे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सतीश चौरे, महानिर्मितीचे संचालक विकास जयदेव उपस्थित होते.

मुंबई : निम्न वर्धा सिंचन प्रकल्प येथे प्रस्तावित ७ मेगावॉट व बेंबळा सिंचन प्रकल्पापैकी ८ मेगावॉटच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (ता. २८) दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार डॉ. अनिल बोंडे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे संचालक अ. ब. सुर्वे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सतीश चौरे, महानिर्मितीचे संचालक विकास जयदेव उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत आर्वी उपसा सिंचन योजना (४.२ मेगावॉट) व खर्डा बॅरेज उपसा सिंचन योजना (२.८ मेगावॉट) यासाठी सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पासाठीचा विकास आराखडा व प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. बेंबळा येथील सिंचन प्रकल्पावर ८ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी या वेळी घेतला.

बेंबळा व निम्न वर्धा येथील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती येण्यासाठी अभियंत्यांची पदे भरती करण्यात यावीत, असेही ऊर्जामंत्र्यांनी या वेळी सांगितले. राज्यातील सर्व उपसा सिंचन प्रकल्प सौरऊर्जेवर चालविण्याचा शासनाचा मानस असून, पुढील १० वर्षांत ४० लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा पुरविण्याचा शासनाचा निर्धार आहे. यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

इतर बातम्या
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून...
नांदेड: माहूर मंडळात मुसळधारमाहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून...
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सरऔरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने...
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर...लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या...
पोपट पाळल्यास तुरुंगवासमुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू...
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना...औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील...
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे...मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
पाणीउपशावर नियंत्रण आवश्यक ः राजाराम...नाशिक : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
करमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्जकरमाळा, जि. सोलापूर  : करमाळा कृषी उत्पन्न...
द्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला...सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे....
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
बोंड अळीच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा...बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक...