agriculture news in marathi, In spite of Muktainagar, the cultivation of banana plantation in the district is stopped | Agrowon

मुक्ताईनगर वगळता जिल्ह्यात मृगबहार केळी लागवड रखडली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

``रावेर, मुक्ताईनगरात मृगबाग लागवड बऱ्यापैकी दिसत आहे; परंतु कमी दरांचा फटका सर्वांना बसत आहे. बऱ्हाणपुरातही दर यंदा कमी झाले आहेत. केळीची आवक अधिक आहे. यावल, चोपडा भागात मृग बाग फारसे नाहीत.``
- ऋषीकेश महाजन, शेतकरी, नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)

जळगाव : जिल्ह्यात मृग नक्षत्रातील म्हणजेच मृगबहार बाग केळीची लागवड रखडतच सुरू आहे. रावेर, मुक्ताईनगरात लागवड बऱ्यापैकी आहे. परंतु जामनेर, चोपडा, पाचोरा, जळगावात आदी भागातील क्षेत्र कमी आहे. या महिन्याच्या मध्यात लागवडीला गती मिळाली. मृग नक्षत्रात ढगाळ वातावरण असते. तापमानही कमी होते. पाणी कमी लागते. पाऊस झाला तर सिंचनाची गरज नसते. त्यामुळे शेतकरी या काळात केळी लागवडीस पसंती देतात. रावेर, यावलमधील काही शेतकरी कंद लागवडीला पसंती देत आहेत. उतिसंवर्धित रोपांनाही मागणी असून, त्याच्या प्रतिरोपास १३ ते १४ दर आहे.

कमी दरांमुळे नाराजी :

केळीचे दर मे महिन्यातच कमी झाले. दर्जेदार केळी वादळात जमीनदोस्त झाली. रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा येथे नुकसान झाले. निपाह विषाणूसंबंधीच्या अफवांनी बाजार कोसळल्याचाही फटका बसला. जादा (ऑन) दर मिळणे बंद झाले. दर्जेदार, निर्यातक्षम केळीला एप्रिलमध्ये २०० रुपये प्रतिक्विंटल जादा दर मिळाले.

सध्या जाहीर दरांपेक्षा १०० रुपये कमी दराने खरेदी सुरू आहे. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजार समितीत सध्या प्रतिदिन ४०० वाहने (प्रतिमोटार १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होत आहे. यावल, रावेरात मिळून ३५० ते ४०० ट्रक केळीची आवक सुरू आहे. कमी दर्जाच्या केळीला ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

केळीसंबंधीचे चित्र मागील दोन महिने सकारात्मक नसल्याने चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात मृग बहार केळी लागवड अतिशय कमी असून, तिचे क्षेत्र अंदाजित दीड ते दोन हजार हेक्‍टर असण्याचा अंदाज आहे.

मुक्ताईनगर, रावेरात केळीला चांगले पर्यायी पीक नसल्याने केळीची लागवड कायम असून, १७  हजार हेक्‍टरवर मृगबागांची लागवड होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. केळी लागवडीसाठी राखीव क्षेत्रात काहींनी सध्या धैंचाची पेरणी केली आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...