agriculture news in marathi, spraying experiment through drone done in akola agriculture college, Maharashtra | Agrowon

अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग (व्हिडिअोसह)
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गुरुवारी (ता.२०) करण्यात आला. कृषी विद्यापीठ, पडगीलवार समूह अंतर्गत पॅडसन्स इंडस्ट्री त्यासोबतच टाटा कल्सन्टंसी सर्व्हिसेस व हैदराबाद येथील काही खासगी कंपन्यांचे सहकार्य याकामी घेण्यात आले. 

नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गुरुवारी (ता.२०) करण्यात आला. कृषी विद्यापीठ, पडगीलवार समूह अंतर्गत पॅडसन्स इंडस्ट्री त्यासोबतच टाटा कल्सन्टंसी सर्व्हिसेस व हैदराबाद येथील काही खासगी कंपन्यांचे सहकार्य याकामी घेण्यात आले. 

विदेशात हजारो एकरांवरील क्षेत्रावर कीटकनाशक फवारणीसाठी खास विमानांचा उपयोग होतो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात जमीनधारणा कमी असल्याने विमानाने फवारणीला मर्यादा आहेत. त्यामुळे पाठीवरील पंपाच्या माध्यमातून मजुराद्वारे फवारणी केली जाते. नजीकच्या काळात फवारणीदरम्यान सुरक्षाविषयक साधणांकडे दुर्लक्ष केल्याने राज्यात ५५ शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय पुढे येऊ लागला आहे.

राज्यात या संकल्पनेवर काम करण्यासाठी अकोल्यातील पॅडसन्स इंडस्ट्रीजकडून पुढाकार घेण्यात आला. कंपनीचे संचालक श्रीकांत पडगीलवार, अमित  पडगीलवार यांनी त्या संदर्भाने कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याशी चर्चा केली. त्यांना ही संकल्पना पटल्यानंतर हे तंत्रज्ञान विदर्भासह राज्याला देण्याकरिताच्या कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. लवकरच हा करार पूर्णत्वास येईल.

कपाशीवर केली फवारणी
अकोला कृषी विद्यापीठाच्या बाभूळगाव प्रक्षेत्रावरील बिटी कापूस लागवड प्रक्षेत्रावर गुरुवारी ड्रोनद्वारे फवारणीचा पहिला प्रयोग करण्यात आला. कुलगुरू डॉ. विलास भाले, पॅडसन्स इंडस्ट्रीजचे श्रीकांत पडगीलवार, अमित पडगीलवार, टाटा कन्सल्टन्सीचे राजेश उरकुडे, ड्रोन उत्पादक हैदराबाद येथील थॉनोस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पलेल्ली, सहसंचालक प्रत्युक्ष ऍकेप्टी, एजीएस कन्सल्टिंग सर्व्हिसेसचे संचालक विनोद कुमार यांची या वेळी उपस्थिती होती.

 

अशी होते फवारणी
सहा पात्याच्या ड्रोनचा वापर याकामी करण्यात आला. त्यापूर्वी जीपीएसद्वारे ज्या भागात फवारणी करायची आहे; ते क्षेत्र प्रोग्रामिंग करण्यात आले. पाच लिटर क्षमतेची पाणी वाहून नेणारी टाकी या ड्रोनला बसविण्यात आली होती. ऑटोमायझर नोझलद्वारे फवारणी करण्यात आली. नोझलमधून तीन ते पाच मीटर रुंद परिसरावर फवारणी होते. त्याकरिता पिकापासून १ ते २ फुटांपर्यंत ड्रोन उडविले पाहिजे, असे ड्रोन उत्पादक प्रदीप पलेल्ली यांनी सांगितले. पाच लिटर क्षमतेच्या फवारणी ड्रोनची किंमत चार लाख, १० लिटरची पाच लाख तर १५ लिटर क्षमतेच्या ड्रोनची किंमत ७ लाख रुपये आहे.

इतर बातम्या
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
टेंभूच्या पाण्यातून दहा बंधारे भरून द्यासोलापूर : टेंभू-म्हैसाळ योजनेतून सांगोला...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
'सिद्धेश्वर यात्रेची कामे समन्वयाने करा'सोलापूर : सिध्देश्वर यात्रा सुरळीतपणे पार...
उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट...देवळा, जि. नाशिक : देवळा तालुक्यात मोठ्या...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
सीताफळ विकासाकडे कृषी सचिवांचे वेधले...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
दुष्काळी स्थितीत प्राधान्याने उपाययोजना...परभणीः परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे...
येणेचवंडी प्रकल्पाला गळतीगडहिंग्लज, जि. कोल्हापूर : येणेचवंडी (ता....
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
पाच मिनिटांत १२० कोटींच्या नियोजनास...जळगाव : समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
नवेगावबांधमध्ये पावसाने शेकडो क्विंटल...नवेगावबांध, जि. गोंदिया : येथील शासकीय...
अधिस्वीकृती समितीच्या बैठकीकडे माफसूचे...नागपूर   ः राज्यातील काही कृषी...